देश

बापरे पैसेच पैसे! गायिकेवर केली पैशांची उधळण, व्हिडिओ व्हायरल

भक्ती सोमण-गोखले

तुमची कला आवडली तर लोकं प्रशंसा करतात. चार शब्द तुमच्याविषयी चांगले सांगून लोकांना ती कला पाहण्यासाठी आग्रह धरतात. गाण्याबाबत म्हणाल तर कुठल्याही संगीत मैफिलीत गाणे आवडले की लोकं ते पुन्हा म्हणण्याची फर्माईश करतात. पण एका गायिकेचं गाणं आवडत म्हणून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर चक्क पैशांची उधळण केलीय. त्या गायिकेने तो व्हिडिओ सोशल मिडियावर टाकल्यावर तो व्हायरल झाला आहे.

उर्वशी रादादिया असे या गायिकेेचे नाव आहे. ती अहमदाबाद येथील प्रसिद्ध लोकगायिका आहे. 4 दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती गात असताना काहीजण पैशांनी भरलेल्या पिंपातले पैसे तिच्यावर उधळत असल्याचे पाहायला मिळते. तसेच इतरही अनेकजण ती गात असताना पैसे फेकत असतात. स्टेजवर सगळीकडे पैसेच पैसे दिसतात. एवढे पैसे बघून साहजिकच आश्चर्य वाटते. माहितीनुसार, तिच्या प्रत्येक लाईव्ह शोमध्ये तिच्या गाण्यांना ही प्रतिक्रिया मिळते. उर्वशी यांच्यासाठी ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. उर्वशी या जमा झालेल्या पैशांचा वापर गरीब मुलींच्या विवाह आणि इतर चांगल्या गोष्टींसाठी करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्षलमुक्त बस्तरमध्ये शूर जवानांसोबत साजरी करणार दिवाळी; म्हणाले- देशासाठी जवानांचे योगदान अतुलनीय

IND U19 vs PAK U19, Live Streaming: भारताने जिंकला टॉस! पाकिस्तानचे हिशेब चुकते करण्याची संधी, Playing XI मध्ये द्रविड-सेहवाग

'माझी तुम्हाला विनंती नाहीतर तो...' रामायणबद्दल बोलताना सनी देओल बोलला की, 'बॉलिवूडसारख्या..'

Mumbai News: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर महापालिकेचा अ‍ॅक्शन मोड, अंधेरीत बेकायदा हॉटेलांवर हातोडा

Latest Marathi News Live Update: लालकृष्ण अडवाणींच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचे नवी दिल्ली येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात हवन

SCROLL FOR NEXT