arvind kejriwal 
देश

माझा निर्णय जनताच घेईल - केजरीवाल

पीटीआय

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज भाजपच्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर देत सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढले. भाजप नेत्यांकडून केजरीवालांची तुलना थेट दहशतवाद्यांसोबत होत असताना, ‘मी दहशतवादी आहे की मायबाप जनतेचा पुत्र, हे दिल्लीतील जनता ठरवेल,’ असे त्यांनी म्हटले आहे.

केजरीवाल म्हणाले, ‘‘दिल्लीतील जनताच मी त्यांचा भाऊ आहे की मुलगा आहे की दहशतवादी, हे ठरवेल. याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मी जनतेकडे सुपूर्त करीत आहे. देशासाठी मी प्राणाची बाजी लावली होती. तीव्र स्वरूपाचा मधुमेह असतानादेखील मी उपोषण केले होते. या मधुमेहाच्या आजारामुळेच मला रोज दिवसातून चारवेळा इन्सुलिन घ्यावे लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर इन्सुलिन घेणाऱ्या व्यक्तीने तीन ते चार तासदेखील काही खाल्ले नाही तर ती तत्काळ कोसळून मरण पावू शकते. अशा परिस्थितीमध्ये मी दोनदा आमरण उपोषण केले होते. यातील पहिले उपोषण हे पंधरा, तर दुसरे दहा दिवसांसाठी होते.’’

राजकीय आघाडीवर
तृणमूल काँग्रेसचा ‘आप’ला पाठिंबा
निवडणूक आयोगाची भाजपला नोटीस
‘आप’चे नेते संजय सिंह, पंकज गुप्तांचे निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर आंदोलन
तिमारपूर भागात केजरीवालांचा रोड शो
‘आप’च्या आठवडाभरात दिल्लीत आठ हजार सभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

VAIBHAV SOORYAVANSHI: वय अवघं १५ वर्षं... पण विक्रमांची यादी मोठमोठ्या खेळाडूंना टक्कर देणारी वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत काय काय केलं?

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT