देश

लस नको! एकजण चढला झाडावर तर दुसऱ्याची नावेतून उडी; VIDEO VIRAL

सकाळ डिजिटल टीम

लसीकरण करण्यासाठी आलेल्यांना पाहून घाबरलेल्या दोघांनी जे केलं ते पाहून हसावं की रडावं असंच वाटेल. अशाही परिस्थितीत संबंधितांना लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी तयार केलं.

दिल्ली - देशभरात कोरोना (Corona) प्रतिबंधक लसीकरण मोहिम वेगाने राबवली जात आहे. या लसीकरणाचा पुढचा टप्पा म्हणजे १५ ते १८ वयोगटातील मुलांनाही लस देण्यात येत आहे. दरम्यान, अद्याप काही ठिकाणी लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशा नागरिकांना समजावून सांगून आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लसीकरण केले जात आहे. आता उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहारमधील (Bihar) काही व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये कोरोना लसीकरण करण्यासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहताच एक व्यक्ती झाडावर चढली, तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एकजण त्या कर्मचाऱ्यांवरच धावून गेला असल्याचं दिसत आहे.

उत्तर प्रदेशातील बलियात लस देणारे पथक गावात पोहोचले होते. तेव्हा घाबरलेल्या आणि लस घेण्यासाठी तयार नसलेल्या व्यक्तीने इतरत्र धावायला सुरुवात केली. तो शेवटी झाडावर चढून बसला. तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या मनातली लसीबद्दलची भीती काढून टाकत त्याला समजावले. शेवटी कशीबशी त्या व्यक्तीने लस टोचून घेतली.

आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये नदी किनारी लसीकरण करणारं पथक पोहोचल्यानंतर एक व्यक्ती नावेत चढतो. त्यानंतर आपण लस घेणार नाही असंही सांगतो. मी लस घेणार नाही असं म्हणत तो कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येतो. त्यानं धक्काबुक्कीसुद्धा केली. मात्र कर्मचाऱ्यांनी त्याचीही समजून काढून लस दिली.

भारतात आतापर्यंत १६० कोटींहून अधिक लशीचे डोस देण्यात आले आहेत. तर आजच्या दिवसात दुपारी १२ वाजेपर्यंत ३८ लाख जणांना डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत देशात ७० कोटी ९३ लाख ५६ हजार ८३० टेस्ट झाल्या आहेत. तर बुधवारी दिवसभरात १९ लाख ३५ हजार १८० चाचण्या झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

SCROLL FOR NEXT