Perform his own Rituals Shraddha of Death 
देश

स्वत:चं श्राद्ध घातलं.. तेराव्याचं जेवण दिलं, दोन दिवसांनी झाला खरंच मृत्यू; नेमकं काय घडलं?

Perform his own Rituals Shraddha of Death: यूपीच्या एटामध्ये एक विचित्र आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने जिवंतपणी आपला अंत्यविधी केला होता. त्याने स्वत:च्या तेराव्याला गावातील ७०० लोकांना जेवू देखील घातले होते.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- यूपीच्या एटामध्ये एक विचित्र आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने जिवंतपणी आपला अंत्यविधी केला होता. त्याने स्वत:च्या तेराव्याला गावातील ७०० लोकांना जेवू देखील घातले होते. त्याचा दोन दिवसात खरंच मृत्यू झाला आहे. ५५ वर्षांचे हाकिम सिंह यांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. हाकिम सिंह यांना मुलंबाळं नव्हते असं कळतंय.

दाव्यानुसार, मेल्यानंतर आपला अंत्यविधी नातेवाईकांमधील कोणीही करणार नाही. आपलं पिंडदान कोणी करेल असंही त्यांना वाटत नव्हतं. मुल नसल्यामुळेही ते काहीसे नाराज होते. त्यामुळे त्यांनी स्वत: आपला अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला होता. तेराव्याचे जेवण दिल्यानंतर दोन दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. ( perform his own rituals Shraddha of death two days later he really died)

रात्री ते व्यवस्थित झोपले होते, पण नेहमीप्रमाणे ते सकाळी लवकर झोपेतून उठले नाहीत. त्यामुळे काही लोकांना शंका आली. त्यांनी घराबाहेर टाकलेल्या त्यांच्या पलंगाजवळ जाऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. त्यांचा श्वास थांबला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. माहिती मिळाल्यानंतर हाकीम सिंग यांचे भाऊ- पुतणे घटनास्थळी आले. नातेवाईकांनी म्हटलंय की हाकिम सिंहचे अंत्यसंस्कार नियमाप्रमाणे केले जातील.

माहितीनुसार, हाकिम सिंह यांना त्यांच्या नातेवाईकांवर थोडासाही विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या अंत्यसंस्काराच्या खर्चासाठी आपली काही जमीन विकली होती. तेराव्याला जेवण देण्यासाठी त्यांनी शेकडो गावकऱ्यांना बोलावलं होतं. पिंडदान केलं होतं, तसेत ब्राह्मणांना बोलावून सर्व विधी, होमहवन देखील केले होते. स्वत:च स्वत:चा अंत्यसंस्कार केल्याने या घटनेची चर्चा परिसरात होत होती.

हाकिम सिंह यांना आपला मृत्यू दिसला होता का अशी चर्चा आता होऊ लागली आहे. तेराव्याचा विधी पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसातच त्यांचा मृत्यू झालाय. सदर घटना योगायोगाने घडली की हाकिम सिंह यांना आपल्या मृत्यूची जाणीव झाली होती याचं उत्तर आपल्याला देता येणार नाही. पण, सदर घटना लोकांच्या चर्चेचा विषय ठरलीये हे नक्की. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT