Petition filed Supreme Court Nupur Sharma remarks Petition filed Supreme Court Nupur Sharma remarks
देश

नूपुर शर्मावरील टिप्पणी मागे घ्यावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फटकारले आहे. कोर्टाने त्यांना टीव्हीवर देशाची माफी मागण्यास सांगितले. यामुळे सामाजिक कार्यकर्ते अजय गौतम यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल (Petition filed) केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान नूपुर शर्मावर केलेली टिप्पणी मागे घेण्याची मागणी केली आहे.

तुमच्या वक्तव्यामुळे तुम्हाला धोका नसून देशाला धोका निर्माण झाला आहे, अशी टीका न्यायालयाने केली आहे. इतकेच नाही तर आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे व उदयपूरमध्ये घडलेल्या घटनेमागे तुमचे वक्तव्य आहे, असेही कोर्टाने म्हटले आहे. यानंतर ही याचिका दाखल (Petition filed) करण्यात आली आहे. तसेच सीजेआयला पाठवलेल्या याचिकेत नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांच्या जिवाला यामुळे धोका असल्याचे म्हटले आहे.

शुक्रवारी नूपुर शर्माच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांच्यावर देशाच्या विविध भागांत गुन्हे दाखल असल्याचे सांगितले. त्यांच्या जिवाला धोका असल्याने केस दिल्लीला वर्ग करण्यात यावे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत आधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करायची असती, असे सांगितले.

आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. नूपुर शर्मा प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निरीक्षण मागे घ्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजय गौतम यांनी केली आहे. नूपुर शर्माच्या जिवाला धोका असल्याचा युक्तिवाद याचिकेत केला आहे. त्यांना न्याय चाचणीची संधी मिळाली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT