Hathras Stampede sakal
देश

Hathras Stampede : ‘एसआयटी’मार्फत चौकशीची याचिका

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीची तज्ज्ञांच्या समितीमार्फत चौकशी केली जावी, अशा याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीची तज्ज्ञांच्या समितीमार्फत चौकशी केली जावी, अशा याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. हाथरसमधील फुलरई गावात मंगळवारी (ता. २) एका सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतांश महिला आहेत.

‘‘हाथरस येथील घटना अक्षम्य दुर्लक्षामुळे झाली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाच तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती नेमावी. गर्दीच्या ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्यास या समितीला सांगितले जावे,’’ अशी विनंती वकील विशाल तिवारी यांनी याचिकेद्वारे केली आहे

हाथरस येथील चेंगराचेंगरीच्या प्रकरणाचा वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश उत्तर प्रदेश सरकारला दिले जावेत. तसेच चेंगराचेंगरीसाठी कारणीभूत असलेले लोक, प्रशासनातले अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले जावेत, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. हाथरस येथे भोलेबाबा नावाच्या स्वयंघोषित बाबाने आयोजित केलेल्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी झाली होती. सत्संगासाठी ८० हजार लोकांना बोलाविण्याची परवानगी दिलेली असताना अडीच लाखांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

Nautapa 2026: नवतापा म्हणजे काय? वर्षातील सर्वात गरम दिवसांमागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

Maharashtra Monsoon Update : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार! दक्षिण भारतातून मॉन्सूनची वाटचाल सुरू; जाणून घ्या महाराष्ट्रात कोणत्या तारखेला होणार एन्ट्री?

IPL 2026 Qualifier 1: RCB-GT यांच्यातल्या पराभूत संघाला फायनलसाठी एक अतिरिक्त संधी का मिळणार? IPL Rule Explained

Amit Shah: बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना देशाबाहेर काढण्याचा निर्णय! घुसखोरांसाठी अमित शाहांचं मोठं पाऊल; उच्चस्तरीय समिती गठीत

SCROLL FOR NEXT