Petrol-Diesel Price Today esakal
देश

..अखेर पेट्रोल-डिझेल दरवाढीनं गाठला मुहूर्त; तब्बल साडेचार महिन्यानंतर इंधन दरवाढ

सकाळ डिजिटल टीम

तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं आहे.

Petrol-Diesel Price Today : आजपासून देशात पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) महागलंय. तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं असून आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलची (Diesel Price) दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल 112 डॉलर पोहचलीय, त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झालीय.

आजपासून (मंगळवार) इंधनाच्या दरात 80 पैशांची वाढ होणार आहे. 137 दिवसानंतर ही दरवाढ लागू होणार आहे. नवीन किंमती आज सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतील. सोमवारी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. वृत्तसंस्था रॉयटर्सनं (Reuters) दिलेल्या वृत्तानुसार, मध्यरात्री दरवाढीसंदर्भात डीलरनं माहिती दिलीय. त्यानुसार मंगळवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 80 पैसे प्रती लिटरची दरवाढ झालीय. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शेवटची दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर दिवाळी व पुढं निवडणुका (Election) यामुळं सरकारनं दरवाढ थोपवल्याची चर्चा रंगली होती. तसंच निकालानंतर लगेचच मोठी दरवाढ होईल, अशीही भीती व्यक्त होत होती. दरम्यान, इंधनाच्या किरकोळ किंमतींविषयी तेल कंपन्यांनी मंगळवारी ही माहिती दिलीय.

दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.21 रुपये

रशिया-युक्रेन युद्धानंतर (Russia-Ukraine war) जागतिक पातळीवर तेलाच्या किंमतीत वाढ झालीय. सध्या झालेली दरवाढ 1 टक्क्यांहून कमी आहे. दिल्लीत मंगळवारी एक लिटर पेट्रोलची किंमत 96.21 रुपये आणि डिझेलची एक लिटरची किंमत 87.47 रुपये होईल. किंमतीत आता नियमीत वृद्धी होऊ शकते, असं एका डीलरनं सांगितलंय. तसेच मुंबईत प्रति लिटर पेट्रोल 110.82 आणि 95.00 रुपये डिझेल, कोलकातामध्ये पेट्रोल 105.51 आणि 90.62 रु. डिझेल, तर चेन्नईमध्ये अनुक्रमे 102.16 आणि 92.19 रुपये इतकं आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. या नव्या किंमती सकाळी 6 वाजेपासून लागू होतात.

तुमच्या शहरातील इंधन दर जाणून घ्यायचे आहेत?

आपण एसएमएसद्वारे (SMS) पेट्रोल-डिझेलचे दररोजचे दर जाणून घेऊ शकता (How To Check Diesel Petrol Price Daily). इंडियन ऑईलच्या ग्राहकांना RSP टाईप करुन 9224992249 या मोबाईल क्रमांक आणि बीपीसीएल (BPCL) ग्राहकांनी RSP टाईप करुन 9223112222 क्रमांकावर पाठवावा. तर, एचपीसीएल (HPCL) ग्राहक एचपीप्राइस (HPPrice) टाईप करुन तो 9222201122 या मोबाईल क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; कर्जमाफीचा मोठा दिलासा देणार : एकनाथ शिंदे

UPSC CSE Notification 2026 : UPSC नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जाहीर; अर्ज प्रक्रिया सुरू

Pune Bar Election : पुणे बार निवडणुकीत साडेसात हजार वकिलांनी बजावला मतदानाचा हक्क, व्यवस्थापनावर नाराजी

Pune News : गंजपेठेत विवाहितेच्या खूनप्रकरणी पतीसह तिघांना अटक; पोलिसांचा सखोल तपास

Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीमुळे नोकरदार व व्यावसायिकांची त्रासदायक प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT