nirmala sitaraman 
देश

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार?; निर्मला सीतारमण यांनी दिले संकेत

सकाळ डिजिटल टीम

पेट्रोल-डिझेल (Petro-Diesel) जीएसटीच्या (GST) कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी मंगळवारी लोकसभेत (Loksabha) सांगितलं. जीएसटी परिषदेच्या पुढील बैठकीत या मुद्द्यावर राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत चर्चा केली जाईल असं त्यांनी सांगितलं. 

सीतारमण लोकसभेत म्हणाल्या, "खासदार वारंवार प्रश्न विचारत आहेत की, पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यात यावं. पण महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवर सर्वाधित कर आहे. मी हे सांगत नाही की एखाद्या राज्यात कर कमी आहे किंवा जास्त आहे. मुद्दा हा आहे की, राज्ये देखील इंधनावर कर वसूल करत आहेत केवळ केंद्र सरकार असं करत नाही. केंद्र सरकार विकास कामांसाठी हा कर वसूल करत आहे. केंद्र सरकार विकास कामांसाठी हा कर वसूल करत आहे." 

"केंद्र आणि राज्ये दोन्हीही इंधनावर कर लावतात. जर इंधनावर कराचा मुद्दा आहे तर त्यावर आजच्या चर्चेच्या आधारावर विचार व्हावा. अनेक राज्ये यावर विचार करतील आणि पुढील जीएसटी परिषदेच्या बैठकीत जर हा मुद्दा उपस्थित करण्यात आला तर मला या प्रकरणावर चर्चा करण्यात आनंद वाटेल," असंही सीतारमण यावेळी म्हणाल्या.

गेल्या आठवड्यात सीतारमण म्हणाल्या होत्या की, कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल, विमानाचं इंधन आणि नैसर्गिक गॅस जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा आत्ता कुठलाही विचार नाही. दरम्यान, कर आधार वाढवण्याच्या गरजेवर भर देताना अर्थमंत्र्यांनी म्हटलं की, सरकारने प्रॉव्हिडंट फंडात कररहित गुंतवणूकीची मर्यादा त्या कर्मचाऱ्यांसाठी ५ लाखांपर्यंत वाढवली आहे जे कर भरत नाहीत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

Panand Road Scheme : अक्षय तृतीयेला पाणंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

SCROLL FOR NEXT