Petrol-Diesel Todays Price Updates | Petrol Diesel Rates  sakal
देश

Petrol-Diesel Rate: तेल कंपन्यांकडून दिलासा; जाणून घ्या आजचे नवे दर

भारतीय तेल कंपन्यांनी नवे दर जाहीर केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Petrol Diesel Rate : दोन दिवसांपूर्वी भारतात पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर आता भारतीय तेल कंपन्यांनी जनतेला दिलासा देत नवे दर जाहीर केले आहेत. आज पेट्रोल डिझेलच्या भावात कोणतीही वाढ करण्यात आलेले नाही त्यामुळे जनतेला दिलासा मिळणार आहे. २१ मे ला केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर इंधनाच्या दरात मोठी कपात झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

(Petrol Diesel Rate 24 May)

दरम्यान २१ मे रोजी केंद्र सरकारकडून पेट्रोलवर ८ आणि डिझेलवर ६ रूपये उत्पादन शुल्क कमी करण्यात आलं होतं. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे प्रत्येकी ९.५० आणि ७ रूपयांनी दर कमी झाले होते. त्यानंतर राज्य सरकारनेही जनतेला दिलासा देत व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेल वरील किंमती अनुक्रमे २.८ रुपये आणि १.४४ रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या.

नव्या दरानुसार मुंबईत पेट्रोल १०९.२७ रुपये तर डिझेल ९५.८४ रुपये प्रतीलिटर प्रमाणे मिळणार आहे. दरम्यान दिल्लीत आज सकाळपासून नवे दर लागू झाले आहेत. दिल्लीत ९६.७२ रुपये प्रतीलिटर पेट्रोल तर ८९.६३ रुपये प्रतीलिटर डिझेल मिळणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातही वेगवेगळ्या शहरानुसार किंमतीत बदल आहेत. आज पुण्यात पेट्रोल १११.०४ तर डिझेल ९५.९० रुपये प्रतीलिटर मिळणार आहे. तसेच कोल्हापूर, नाशिक, नागपूरमध्ये १११ रुपये प्रतीलिटर प्रमाणे पेट्रोल मिळणार आहे. दरम्यान शहरानुसार इंधनाच्या किंमतीत बदल होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT