Petrol-Diesel Price Today esakal
देश

Petrol-Diesel Price Hike : सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत.

Petrol-Diesel Price Today : बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Hike in India) वाढ झालीय. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 83 पैशांनी वाढ केलीय. राजधानी दिल्लीत (Delhi) आज पेट्रोलचा दर 97.01 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 88.27 रुपये प्रति लिटरवर पोहोचलाय.

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. रशिया आणि युक्रेनमधील जवळपास महिनाभर चाललेल्या युद्धाचा परिणाम जगभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरही झालाय. अशा परिस्थितीत देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होण्याची भीती व्यक्त केली जात होती. 10 मार्चला निकाल लागल्यानंतर 22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू लागले आहेत.

तर, दुसरीकडं देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 111.67 रुपयांवर पोहोचलाय, तर एक लिटर डिझेल 95.85 रुपयांना विकलं जात आहे. देशातील आणखी एक महानगर कोलकाता इथं पेट्रोल 106.34 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.42 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 102.91 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.95 रुपये प्रति लिटर झालाय.

तुमच्या इथं पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत?

शहराचे नाव पेट्रोल डिझेल

दिल्ली 97.01 88.27

मुंबई 111.67 95.85

कोलकाता 106.34 91.42

चेन्नई 102.91 92.95

केंद्र सरकारनं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत जनतेला मोठा दिलासा दिला होता. सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात थेट 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांची कपात केली. केंद्राच्या या निर्णयानंतर मध्य प्रदेश, यूपी, बिहारसह जवळपास सर्वच राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटच्या दरात कपात केली होती. त्यानंतर अनेक महिने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले ​​गेले नाहीत.

एलपीजीच्या दरातही वाढ

एलपीजी ग्राहकांनाही आदल्या दिवशी मोठा झटका बसलाय. तेल विपणन कंपन्यांनी एका झटक्यात 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढवलीय. यानंतर बिहारची राजधानी पटनामध्ये एलपीजीची किंमत 1,047.50 रुपयांवर गेली आहे. त्याचप्रमाणं देशातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 1000 रुपयांच्या जवळपास पोहोचलीय.

तुमच्या शहरातील इंधन दर जाणून घ्यायचे आहेत?

आपण एसएमएसद्वारे (SMS) पेट्रोल-डिझेलचे दररोजचे दर जाणून घेऊ शकता (How To Check Diesel Petrol Price Daily). इंडियन ऑईलच्या ग्राहकांना RSP टाईप करुन 9224992249 या मोबाईल क्रमांक आणि बीपीसीएल (BPCL) ग्राहकांनी RSP टाईप करुन 9223112222 क्रमांकावर पाठवावा. तर, एचपीसीएल (HPCL) ग्राहक एचपीप्राइस (HPPrice) टाईप करुन तो 9222201122 या मोबाईल क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

Pune News : प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात; दंड भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

Vishwas Pathak : जीएसटी कमी झाल्याने नागरिक आनंदी; भाजप प्रवक्ते विश्‍वास पाठक

SCROLL FOR NEXT