Petrol Price Rise In Past Six Days Highest In Two Years 
देश

सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले; पाहा आजचे दर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः सौदी अरामकोच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतात इंधन दरवाढीचे सत्र सुरू असून, ते सलग सहाव्या दिवशी कायम राहिले. मुंबईत रविवारी (ता.22) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 27 पैसे आणि डिझेल दरात प्रतिलिटर 22 पैशांची वाढ नोंदवण्यात आली. सहा दिवसांमध्ये पेट्रोल सुमारे दीड रुपयांनी आणि डिझेल 1 रुपया 31 पैशांनी महागले आहे.

"इंडियन ऑईल कॉर्पोरेशन'च्या माहितीनुसार मुंबईत आज पेट्रोलचा दर 27 पैशांनी वधारून 79.29 रुपये प्रती लिटर झाला आहे. डिझेल 22 पैशांनी वधारून 70.01 रुपये झाले आहे. दिल्लीत पेट्रोल 27 पैशांनी वधारून 73.62 रुपये आणि डिझेल 21 पैशांनी वधारून 66.74 रुपये झाले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 28 पैशांनी आणि डिझेल 23 पैशांनी महागले आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर 76.52 रुपये असून डिझेलसाठी ग्राहकांना 70.56 रुपये मोजावे लागत आहेत. कोलकत्यात पेट्रोलच्या दरात 27 पैशांची वाढ झाली असून, तो 76.32 रुपये आहे. डिझेलमध्ये 21 पैशांची वाढ झाली असून, तो 69.15 रुपये आहे. 

भारताला इराणनंतर सर्वाधिक तेल पुरवठा सौदी अरेबियाकडून केला जातो. दरमहा सौदीमधून 20 लाख टन खनिज तेलाचा पुरवठा होतो. त्यापैकी चालू महिन्यात 12 ते 13 लाख टन तेल पुरवठा झाला आहे. दरम्यान, ड्रोन हल्ल्यामुळे सौदी अरामकोने उत्पादनात कपात केली होती. दोन्ही प्रकल्पांमधील खनिज तेलाचे उत्पादन महिनाअखेर पूर्वपदावर येईल, असा विश्‍वास कंपनीच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. 

शहरे         पेट्रोल              डिझेल 
मुंबई         79.29             70.01 
दिल्ली       73.62            66.74 
कोलकता    75.43            68.42 
चेन्नई        76.52           70.52 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: पृथ्वी शॉ झाला महाराष्ट्राचा कर्णधार! ऋतुराज गायकवाडला संघात स्थान का नाही? पाहा संपूर्ण टीम

Satara Girl Death : सेकंदाच्या रागात उद्ध्वस्त झालं कुटुंब! साताऱ्यात शिक्षक बापानं 17 वर्षाच्या पोरीला क्रिकेटच्या बॅटनं संपवलं; मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

पुण्यातील 'या' ठिकाणी झालेलं माहेरची साडी सिनेमाचं शुटिंग, सिनेमातील घर आठवतय का? अजूनही गाजलेलं शूटिंग लोकेशन!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Kalika Mata Tradition: माते, काही चूक झाली असेल तर माफ कर’; येरोळमध्ये कालिका मातेला गावात आणण्यासाठी अनोखी परंपरा, नेमकी काय आहे परंपरा?

SCROLL FOR NEXT