Petrol 
देश

मुंबईत पेट्रोल ८० रुपयांवर पोचले

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी वाढ झाली आहे. यामुळे देशांतर्गत इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल १६ ते १७ पैसे तर डिझेल प्रति लिटर १८ ते १९ पैशांनी महागले आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमधील पेट्रोलच्या किंमती अनुक्रमे ७५.०४ रुपये, ७७.७० रुपये, ८०.६९ रुपये आणि ७८.०२ रुपये प्रतिलिटरवर पोचल्या आहेत. आता ग्राहकांना पुन्हा एकदा इंधन वाढीचे चटके बसणार आहे. 

जागतिक पातळीवर खनिज तेलाची किंमत प्रतिबॅरल ६५ डॉलरपर्यंत वाढल्या आहेत. परिणामी तेल आयातीच्या खर्चात वाढ झाल्याने देशांतर्गत इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलची भाववाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली, तर डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशीही वाढ कायम आहे.

इंटरकॉन्टिनेंटल एक्‍सचेंजमध्ये (आयसीई) आंतरराष्ट्रीय फ्युचर्स मार्केटमध्ये सोमवारी बेंचमार्क ‘ब्रेंट क्रूड’ची किंमत गेल्या सत्राच्या तुलनेत ०.२२ टक्‍क्‍यांनी वाढून ६७.०२ डॉलर प्रति बॅरलवर पोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: मोठा निर्णय! सुप्रीम कोर्टाने रद्द केला उच्च न्यायालयाचा निकाल, अचानक उलटला खेळ… सगळेच झाले थक्क!

"आता मला माझ्या कुटुंबाकडे लक्ष द्यायचंय" आघाडीच्या मराठी अभिनेत्रीचा मोठा निर्णय "वर्षातून एक सिनेमा.. "

Ashok Kharat HIV Test Report Result : 150 महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचा HIV रिपोर्ट आला समोर; चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

Parner News: सहकार क्षेत्रात खळबळ! सैनिक सहकारी बँकेच्या १७ जणांचे संचालक मंडळ बरखास्त; पारनेरच्या सहायक निबंधकांची नियुक्ती..

Sangli Crime News : पैसे चोरल्याचा संशय, बापाची शिक्षा मुलींच्‍या जीवावर, ३६ तास तुळईला उलटे टांगून आई -बाप तिथेच झोपले, एकीचा मृत्‍यू, दुसरी गंभीर

SCROLL FOR NEXT