Pets Registration esakal
देश

Pets Registration : तुम्ही तुमच्या पेट्स रजिस्ट्रेशन केलंय का? 1 जून पासून बसणार फाइन

पाळीव प्राण्यांची नोंदणी करणे हे बंधनकारक झाले आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Non Registered Pet Owners Need To Pay Fine From 1st June : गेल्या वर्षापासून देशातल्या सर्व मोठ्या शहरांच्या महापालिकांनी सर्व पाळीव प्राण्यांची नोंदणी करून परवाना घेणे सक्तीचे केले आहे. यात मुंबई, नोएडा, दिल्ली, बंगळूरु, चेन्नई, आसाम यांचा समावेश आहे. तर पुण्यातही मांजर पाळण्यासाठी परवाना सक्तीचा करण्यात आला आहे.

या वर्षी काही ठिकाणी हा परवाना काढण्याची अंतिम तारीख फेब्रुवारी महिन्यात संपली आहे. त्यामुळे विनापरवाना पाळीव प्राणी ठेवणाऱ्या मालकांवर येत्या १ जून पासून कारवाई होणार असल्याचे मीडिया रिपोर्टमधून समोर आले आहे. याविषयीची कारवाई नोएडात होणार असल्याचं वृत्त आहे.

त्यामुळे पुणेकर पेट प्रेमींनो तुम्हीही आता सावध व्हा. अशी कारवाई आपल्याकडेही लवकरच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नोएडा प्राधिकरण आता एक सर्वेक्षण करेल आणि 1 जूनपासून अद्याप आपल्या पाळीव प्राण्यांची नोंदणी न केलेल्या कुत्रा आणि मांजर हाताळणाऱ्यांवर दंड आकारेल. आतापर्यंत, 5,974 प्राण्यांची नोंदणी झाली आहे, ज्यात सुमारे 70 मांजरींचा समावेश आहे, डीजीएम नोएडा एसपी सिंह यांनी सांगितले. परंतु आम्ही अद्याप संख्या मोजत आहोत आणि एकूण नोंदणी 6,000 पेक्षा थोडी जास्त असू शकते, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आले आहे.

त्यामुळे पाळीव प्राण्याचा परवाना ज्यांनी अद्याप काढलेला नाही, त्यांनी तो कसा काढावा जाणून घ्या.

महापालिका अधिनियमानुसार कुत्रे, घोडे, मांजर अशा सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांची नागरिकांनी महापालिकेकडे नोंदणी करून परवाना घेणे आवश्‍यक आहे. पण शहरात केवळ कुत्रे व घोडे यांचे परवाना घेतले जातात. पण त्यांचीही संख्या कमी आहे. मांजर पाळण्याचे प्रमाणही वाढत असले तरी परवाना घेण्याबाबत नागरिकांची मानसिकता नाही.

कशी करावी नोंदणी

  • मांजराची नोंदणी करण्यासाठी वार्षिक ५० रुपये इतके शुल्क निश्‍चीत केले आहे.

  • नोंदणीसाठी नागरिकांचा रहिवासी पुरावा,

  • अँटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो या तीन कागदपत्रांची गरज आहे.

दरवर्षी नव्याने नोंदणी करावी लागेल.

  • नूतनीकरण करताना ५० रुपये परवाना शुल्काशिवाय अतिरिक्त २५ रुपये शुल्क घेतले जाणार आहे. यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

  • महापालिकेने कुत्र्यांची नोंदणी व परवाना घेण्याची प्रक्रिया आॅनलाइन केली आहे. त्याच पद्धतीने मांजरांची नोंदणीही आॅनलाइन नोंदणी करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT