Maharashtra ATS  esakal
देश

MP Police : PFI संघटनेच्या आणखी तीन सदस्यांच्या आवळल्या मुसक्या; सरकारविरोधात रचत होते कट

पोलिसांनी पीएफआय या प्रतिबंधित संघटनेच्या तीन सदस्यांना अटक केली.

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांनी गेल्या काही दिवसांत प्रतिबंधित संघटनेच्या चार जणांनाही ताब्यात घेतलंय.

भोपाळ : मध्य प्रदेश पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India PFI) या प्रतिबंधित संघटनेच्या तीन सदस्यांना अटक केलीये. त्यांच्यावर सरकारविरोधात कट रचल्याचा आणि बेकायदेशीर कामात सहभागी असल्याचा आरोप आहे.

त्यानंतर पोलिसांनी पीएफआय या प्रतिबंधित संघटनेच्या तीन सदस्यांना अटक केली. रविवारी तिघांनाही अटक केल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे.

यासोबतच, पोलिसांनी गेल्या काही दिवसांत प्रतिबंधित संघटनेच्या चार जणांनाही ताब्यात घेतलंय. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये शनिवारी PFI संघटनेच्या दोन सदस्यांना अटक करण्यात आली. तर, तिसऱ्याला महाराष्ट्रातील औरंगाबाद येथून अटक केली. एमपी पोलिसांच्या (MP Police) स्पेशल टास्क फोर्सनं गेल्या वर्षी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात त्याला अटक केलीये.

'या' कलमान्वये गुन्हा दाखल

पोलिसांनी सांगितलं की, गुलाम रसूल शाह (वय 37, रा. धार), साजिद खान उर्फ ​​गुलाम नबी (56, रा. इंदोर) आणि परवेझ खान (30, रा. औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्यावर कलम 121 ए (सरकारविरुद्ध कट रचणे), 153 बी आणि 120 बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT