crime crime
देश

छायाचित्रकाराचा आढळला मृतदेह; करीत होते आर्थिक अडचणीचा सामना

सकाळ डिजिटल टीम

गुजरातमध्ये पत्रकाराचा भर रस्त्यात खून केल्याची घटना ताजी असताना चेन्नईतील एका वृत्तसंस्थेसाठी काम करणारे ज्येष्ठ छायाचित्रकार टी कुमार हे कार्यालयात मृतावस्थेत (Photojournalist body found ) आढळले. पोलिसांना छायाचित्रकाराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

एका सहकाऱ्याला रविवारी रात्री एजन्सीच्या कार्यालयात कुमार यांचा मृतदेह आढळला. सोमवारी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. कुमार हे ५६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा आप्तपरिवार असल्याची माहिती संस्थेच्या सूत्रांनी सोमवारी दिली. ते आर्थिक अडचणीचा सामना करीत (Photojournalist body found ) होते, असेही संस्थेने सांगितले.

टी कुमार यांना ३० वर्षांहून अधिक अनुभव होता. ते छायाचित्र पत्रकार ते वृत्तसंस्थेचे राज्य ब्यूरो चीफ बनले होते. ते १९८६ मध्ये वृत्तसंस्थेत रुजू झाले होते. तामिळनाडूमधील एजन्सीचे राज्य प्रमुख बनणारे ते पहिले छायाचित्रकार होते.

पत्रकाराला भर रस्त्यात भोसकले

दुसऱ्या घटनेत गुजरातच्या सुरतमध्ये पत्रकाराला चौघांनी भररस्त्यात आडवून धारदार शस्त्रांनी भोसकले. ३७ वर्षांच्या या पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. चौघांनी त्यांच्या गाडीला धडक दिली आणि वार केले. यावेळी पठाण यांच्यासोबत पत्नी आणि तीन मुलीही होत्या. हत्येप्रकरणी रांदेर पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. प्राथमिक तपासात पठाण यांची हत्या वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचा अंदाज आहे. कुटुंबातील सदस्यांनी चार संशयितांची नावे दिल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विरोधकांसमोर मोदी सरकार झुकलं! विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जबाबत अमित शहा संसदेत देणार निवदेन, नेमकं काय घडतंय?

Google Drive Update: 10 ऑगस्टपासून फोटो बॅकअप बंद! Google Drive युजर्सनी फोटो-व्हिडिओ सुरक्षित ठेवण्यासाठी 'ही' सेटिंग लगेच बदला

6,6,6,6,6,6! सहा चेंडू, सहा षटकार... युवराज सिंगसारखी तुफान फटकेबाजी, पण इंग्लंडच्या फलंदाजाचा हा पराक्रम आहे थोडा वेगळा Video

Jharkhand Protest : JPSC-JSSC वाद पेटला, आंदोलक विद्यार्थी तारेचे कुंपण भेदून विधानसभेसमोर पोहोचले, पोलिसांकडून लाठीचार्ज

RINKU SINGH LOVE STORY: एका ‘लाईक’पासून सुरू झाली लव्हस्टोरी; प्रियाने सांगितला रिंकूसोबतच्या पहिल्या भेटीचा भन्नाट किस्सा

SCROLL FOR NEXT