Viral Video Esakal
देश

Viral Video: ज्याच्या विरोधात प्रचार करायला आले राहुल गांधी, बॅनरमध्ये त्याचाच फोटो; काँग्रेसचा मोठा गोंधळ

Viral Video: मुख्य मंचावर लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये मांडला मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांचा फोटो लावण्यात आला आहे. याकडे लक्ष वेधले असता लगेचच त्या फोटोवर दुसरे पोस्टर चिकटवण्यात आले.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशात निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशातच प्रचार, सभा, दौरे यांना वेग आल आहे. अशातच काँग्रेसच्या निवडणूक रॅलीदरम्यानचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून तो चर्चेचा विषय ठरला आहे.

मध्य प्रदेशातील मंडला येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवडणूक रॅलीपूर्वीच जबाबदारी असलेल्यांच्या दुर्लक्षामुळे पक्ष अडचणीत सापडला आहे. मुख्य मंचावर लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये मांडला मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांचा फोटो लावण्यात आला आहे. याकडे लक्ष वेधले असता लगेचच त्या फोटोवर दुसरे पोस्टर चिकटवण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मध्य प्रदेशातील एक घटना जोरदार चर्चेत आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मंडला येथील निवडणूक रॅलीपूर्वी मुख्य मंचावर भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांचा फोटो फ्लेक्समध्ये लावण्यात आलेले होता. मात्र, कुलस्ते यांचे नाव त्यात लिहिले नव्हते. या फ्लेक्समध्ये काँग्रेसच्या अन्य नेत्यांचीही नावे न लिहिता त्यांचे फोटो लावण्यात आले होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी आज मांडला लोकसभा मतदारसंघातील धानोरा गावात जाहीर सभेला संबोधित करणार असून काँग्रेस उमेदवार ओंकार सिंग मरकम यांच्या बाजूने वातावरण तयार करणार आहेत. येथे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या निवडणूक भाषणापूर्वी मुख्य मंचावर लावण्यात आलेल्या फ्लेक्समध्ये काँग्रेस नेत्यांसोबत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार फग्गनसिंग कुलस्ते यांचेही फोटो लावण्यात आले होते. नंतर चूक निदर्शनास येताच मंचावर लावलेल्या फ्लेक्समध्ये भाजप नेते कुलस्ते यांचा फोटो पट्कन झाकण्यात आला आणि त्या फ्रेममध्ये काँग्रेसचे आमदार रजनीश हरवंश सिंह यांचे पोस्टर चिकटवण्यात आले.

राहुल गांधी आज मध्य प्रदेश दौऱ्यावर

राहुल गांधी सोमवारी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. ते आज धानोरा (सिवनी) आणि बाणगंगा फेअर ग्राऊंड (शहडोल) येथे जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. राहुल दुपारी 2 वाजता सिवनी येथे पोहोचतील. त्यानंतर दुपारी चार वाजता ते शहडोल येथील सभेला उपस्थित राहणार आहेत.

मांडला येथील निवडणूक रोमांचक

मंडला जागेवर भाजपने पुन्हा एकदा फग्गन सिंग कुलस्ते यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, फग्गन नुकतेच निवास मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. कुलस्ते हे मांडला मतदारसंघातून 6 वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत. ते एकदा राज्यसभा सदस्यही राहिले आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी सुमारे 98 हजार मतांनी निवडणूक जिंकली आणि काँग्रेसचे उमेदवार कमल सिंग मारावी यांचा पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT