Pics-by-chandrayaan-2 
देश

‘चांद्रयान-२’ने पाठविले फोटो

पीटीआय

लहान खड्डे, खडकाळ भागांचा समावेश असल्याची इस्रोची माहिती
बंगळूर - ‘चांद्रयान-२’च्या ऑर्बिटरवर बसविण्यात आलेल्या उच्चक्षमतेच्या कॅमेऱ्याने टिपलेले चंद्राच्या पृष्ठभागाचे छायाचित्र भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज प्रसिद्ध केले आहे. या छायाचित्रामध्ये लहान आकाराचे खड्डे आणि खडकाळ भाग दिसून येत आहे, असे इस्रोने केलेल्या ट्‌विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

‘इस्रो’ने म्हटले आहे की, ‘चांद्रयान-२’च्या ऑर्बिटनने ५ सप्टेंबर २०१९ रोजी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागाचे छायाचित्र घेतले होते. चंद्राच्या पृष्ठभागापासून शंभर किलोमीटर उंचीवरून ऑर्बिटरने हे छायाचित्र टिपले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील बोगुल्साव्हस्की विवराच्या परिसरातील हे छायाचित्र आहे. सुमारे १४ किलोमीटर व्यास असलेल्या या विवराची खोली ३ किलोमीटर ऐवढी आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे हे विवर आहे.  या छायाचित्रामध्ये लहान आकाराचे खड्डे आणि खडक दिसून येत असल्याचे इस्रोने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Fraud : अशोक खरात की लक्ष्मण? नाशिकच्या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर; दहावी मार्कशीटमधील 'या' आकड्यांनी उडाली खळबळ, कसं बदललं नाव?

PMP Bus: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक गतिमान; पीएमपीत १५९९ बस दाखल, मेट्रोचा २०० किलोमीटर विस्तार अर्थसंकल्पात जाहीर

Gold Rate Today: एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आजचा ताजा भाव किती?

Hingoli News: तेलाचे दर १५ रुपयांनी वाढले; अमेरिका-इराण युद्धाची झळ आली स्वयंपाकघरापर्यंत

बापरे! शिवानी रांगोळेला नक्की काय झालं? हातात वॉकर घेतलेला फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

SCROLL FOR NEXT