Plane journey Sakal
देश

Plane Journey : विमानप्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ - ज्योतिरादित्य शिंदे

देशात विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी दिली.

पीटीआय

नवी दिल्ली - देशात विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी दिली. देशात २०१४ मध्ये सहा कोटी नागरिक विमानाने प्रवास करत होते; आता ही संख्या सुमारे १४ कोटींवर पोहोचली असल्याचेही ते म्हणाले. तसेच, देशात विमानाचे तिकीट हे रेल्वेच्या पहिल्या श्रेणीच्या वातानुकूलित डब्याच्या तिकिटाएवढे असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात विमानाच्या तिकिटांच्या वाढत्या दराबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी शिंदे यांनी ही माहिती दिली. देशातील नागरी विमान वाहतूक हे नियंत्रणमुक्त क्षेत्र आहे; परंतु, मध्यंतरीचा कोरोनाकाळ आणि इंधनाच्या वाढत्या किमती हे लक्षात घेऊनही विमानाच्या तिकिटाच्या दरात त्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली नसल्याचेही मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

२०३० पर्यंत देशात ४२ कोटी विमानप्रवासी असतील तसेच या क्षेत्राची वाढ तिपटीने झाली असेल, असा आशावादही शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT