goa-tourism
goa-tourism 
देश

गोवा ट्रीपचं नियोजन करताय? जाणून घ्या निर्बंधांची स्थिती!

Amit Ujagare (अमित उजागरे)

पणजी : तुम्ही गोव्याला ट्रीपला जाण्याचं नियोजन करत आहात? मग तिथं सध्या कोविडच्या निर्बंधांची काय स्थिती आहे? हे तुमच्यासाठी जाणून घेणं महत्वाचं आहे. अनेक राज्यांनी आपल्या राज्यातील पर्यटनासंबंधी प्रवासावरील निर्बंध शिथील केले आहेत. पण गोव्यात निर्बंध अद्याप कायम आहेत, जुलैअखेर पर्यंत हे नियम शिथील होणार नाहीत, असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सांगितलं. (Planning a trip to Goa Find out the status of the restrictions there)

"गोव्यात जोपर्यंत सर्वांना लसीचा पहिला डोस दिला जात नाही तोपर्यंत राज्यातील पर्यटन खुलं करण्याचा सरकारचा विचार नाही. तसेच राज्य सरकार ३० जुलैपर्यंत शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे," असं मुख्यमंत्री सावंत यांनी एका खासगी कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना सांगितलं.

पर्यटन उद्योजकांचाही निर्बंधांचा आग्रह

या आठवड्याच्या सुरुवातीस सावंत यांनी पर्यटन उद्योगातील भागधारकांशी बैठक घेतली होती. यावेळी या उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं. "गोव्यात प्रवेश करण्यासाठी प्रोटोकॉलची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. पर्यटकांसाठी क्वारंटाइन सेंटर्स उभारण्यात यावीत तसेच संगीतीक महोत्सवांसारखे कार्यक्रम मार्च 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात यावेत," अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या होत्या.

इव्हेंट ठरु शकतात सुपरस्प्रेडर

त्याचबरोबर मोठ्या गर्दीचे कार्यक्रम जसे हुनर हाट, सनबर्न, धार्मिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम मार्च २०२२ पर्यंत घेण्यास परवानगी देऊ नये. हे इव्हेंट कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरू शकतात, असं ट्रॅव्हल अँड टुरिझन असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शाह यांनी मुख्यमंत्री सावंत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

गोव्यातील कोरोनाची स्थिती

गोव्यात बुधवारी गेल्या चोवीस तासात ३१० कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे गोव्यातील कोरोनाची एकूण संख्या १,६३,३५८ वर पोहोचली. तर दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला त्यामुळे राज्यात एकूण २,९६० जणांचा मृत्यू झाला आहे. चोवीस तासात २,५८८ नव्या चाचण्या झाल्या. त्यामुळे राज्यात आजवर ८,७५,५३८ चाचण्या पार पडल्या आहेत. गोव्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT