plasma therapy and acterma These two treatments are proving successful
plasma therapy and acterma These two treatments are proving successful 
देश

आता कोरोना विषाणूला जावंच लागेल! कारण हे दोन उपचार ठरत आहेत यशस्वी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- संपूर्ण जग कोरोना महामारीविरोधात लढाई लढत आहे. अशात covid-19 विरोधात आपण हळू-हळू विजय मिळवत असल्याचं दिसत आहे. कारण नवीन शोधानुसार असं आढळून आलं आहे की, संधिवातासाठी दिले जाणारे अॅक्टर्मा (Acterma) हे औषध कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. याबरोबरच प्लाज्मा थेरेपी कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकृती लवकर बरी करण्यासाठी प्रभावी ठरत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाच्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

medRxiv.org या वेबसाईटवर एक शोध निबंध प्रकाशित करण्यात आला आहे. यात असा दावा करण्यात आला आहे की, संधिवातासाठी दिले जाणारे अॅक्टर्मा हे औषध कोरोनाग्रस्त रुग्णांना दिल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या अर्ध्याने घटली आहे. त्यामुळे आता कोरोना विषाणूच्या संपूर्ण विनाशासाठी अॅक्टर्मा आणि रेमडेसीवीर हे औषध एकत्र देण्याचा विचार शोधकर्ता करत आहेत.

कोरोना विषाणूविरोधात अजून कोणती लस किंवा औषध निर्माण करण्यास वैज्ञानिकांना यश आलं नाही. त्यामुळे वैज्ञानिक सध्या उपलब्ध असणाऱ्या औषधांचा कोरोनाबाधित रुग्णांवर प्रयोग करत आहेत. त्यात संधिवातासाठी दिले जाणाऱ्या अॅक्टर्मा औषधापासून चांगले परिणाम मिळाले आहेत. प्रयोगादरम्यान, अमेरिकेच्या मिशिगन मेडिसिन येथील 154 कोरोनाग्रस्तांचा यात समावेश करण्यात आला होता. यातील 78 लोकांना अॅक्टर्मा औषध देण्यात आले, तर उलरेल्या 76 जणांना हे औषध दिलं गेलं नाही. ज्या रुग्णांना संधिवाताचं औषध देण्यात आलं होतं, त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता 45 टक्क्यांनी कमी झाली. ज्या लोकांचा जीव वाचला त्यातील अधिकतर तरुण होते हे शोधकर्त्यांनी मान्य केले आहे.

कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हापासून प्लाज्मा थेरेपी उपचार पद्धतीचा विचार केला जात आहे. प्लाज्मा थेरेपी कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर ठरत असल्याचं सिद्ध होत आहे. प्लाज्मा थेरेपीमुळे सामान्य कोरोनाबाधित रुग्ण 5 दिवस आधीच बरे होत आहेत. मात्र, गंभीर असणाऱ्या कोरोनाबाधितांना वाचवण्यात प्लाज्मा थेरेपी अपयशी ठरली आहे. ज्या व्यक्तीचे शरीर प्रतिसाद देणे बंद करते किंवा ज्यांना वेंटिलेटरची आवश्यकता असते, अशांना गंभीर रुग्ण म्हटलं जातं. चायनीज अकॅडमी ऑफ साईन्स आणि पीकिंग यूनियन मेडिकल कॉलेजच्या शोधकर्त्यांनी याबाबतचं संशोधन केलं होतं. ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूची साधी लक्षणे दिसून येतात अशा रुग्णांवर प्लाज्मा थेरेपी केल्याने ते 5 दिवस आधीच बरे होतात, असा शोधकर्त्यांचा दावा आहे.

दरम्यान, कोरोना विषाणू महामारीमुळे जगभरात असामान्य आणि अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जगभरात 67 लाखांपेक्षा अधिक लोक कोरोनाग्रस्त आहेत, तर या विषाणूने आतापर्यंत 3,93,142 लोकांचा बळी घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT