plasma theropy 
देश

हॉटस्पॉट असणाऱ्या शहरांपैकी इंदोर येथे चार रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग

वृत्तसंस्था

इंदोर - देशातील कोरोनाचा सर्वाधिक हॉटस्पॉट असणाऱ्या शहरांपैकी एक असणारे इंदोर येथे प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा स्थानिक रुग्णालयाने केला आहे. श्री अरविंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससेस येथे कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्माचा प्रयोग केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. ‘साइम्स’रुग्णालयाचे डॉ. रवी दोशी यांनी चार पैकी एक रुग्ण २६ वर्षीय युवती असल्याचे म्हटले आहे.

आयसीएमआरच्या प्लाझ्मा थेरेपीच्या प्रोटोकॉलनुसार एक महिला आणि अन्य पुरुष रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. पुरुष रुग्णांचे वय अनुक्रमे २३,४० आणि ५५ आहेत. त्यांच्यावर २६ एप्रिलपासून मोफतपणे प्रयोग केला गेला, असे डॉ. दोशी म्हणाले. प्लाझ्मा थेरेपीसंदर्भात चौघांकडूनही परवानगी घेण्यात आली होती, असेही त्यांनी नमूद केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

इंदूरच्या जिल्हा प्रमुख वैद्यकीय अधिकारी प्रवीण जाडिया यांनी चारही रुग्णांवर प्लाझ्माचा प्रयोग केल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रुग्णांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्लाझ्माचा प्रयोग केल्यानंतर चारही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तसेच त्यांचे सीटीस्कॅन केले असता फुफ्फुसातील कोरोनाचे विषाणू नष्ट झाल्याचेही आढळून आले.

यासंदर्भात आणखी काही रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचा वापर केला जाणार असून त्यानंतरच सर्व अहवाल आयसीएमआरला कळवण्यात येईल, असे डॉ. दोशी म्हणाले. कोरोनामुक्त झालेल्या तीस रुग्णांनी या प्रयोगासाठी रक्तद्रव्य देण्याची तयारी दर्शविली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Forecast : 500 मिमीवरून पाऊस थेट शून्यावर! पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाला अचानक का लागला ब्रेक? 'आयएमडी'ने दिले स्पष्टीकरण

Akola: पीक नुकसानभरपाईसाठी ४० लाख मंजूर; अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

Latest Marathi News Update : सासवडमध्ये संत सोपानकाका महाराजांच्या पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी

Pune Water Supply Update : पुणेकरांना दिलासा ! पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले; खडकवासला धरणात समाधानकारक साठा

भाईजान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? सलमान खानने विकली वांद्र्यातील प्रॉपर्टी, कोट्यवधींची डील

SCROLL FOR NEXT