A K Singh_PM Modi
A K Singh_PM Modi File Photo
देश

मोदींच्या विश्वासू अधिकाऱ्यावर युपी भाजपत महत्वाची जबाबदारी!

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : माजी आयएएस अधिकारी ए. के. शर्मा हे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. शर्मा यांच्यावर उत्तर प्रदेश भाजपमध्ये महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची युपी भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. युपीमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. (PM aide A K Sharma Made UP BJP VP after buzz over role as Minister)

गेल्या काही आठवड्यांपासून शर्मा यांना उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्याबाबत चर्चा सुरु होती. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीत कोरोनाच्या स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती.

युपी सरकारमध्ये नेतृत्वबदल होणार नाही - भाजप

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कोरोनाची स्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचं बोललं जात असून त्यामुळे मुख्यमंत्री योगी अडचणीत आले आहेत. यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात नेतृत्वबदल होणार असल्याच्या चर्चा होत्या. यावर भाजपनं असा कुठलाही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

योगींच्या नेतृत्वाखाली होतील विधानसभा निवडणुका

पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आणि भाजपाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं सुत्रांकडून कळतं. दरम्यान, जूनच्या सुरुवातीला लखनऊमध्ये भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी दोन दिवसांची आढावा बैठक घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

SCROLL FOR NEXT