देश

स्टार्टअप्ससाठी एक हजार कोटींचा निधी; पंतप्रधान मोदी यांची घोषणा 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशातील नव उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आता मोठे पाऊल उचलले असून नव्या स्टार्टअप्सना आर्थिक आधार देण्यासाठी एक हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे. मोदींनी ‘प्रारंभ - स्टार्टअप इंडिया इंटरनॅशनल समीट’मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना या पॅकेजची घोषणा केली. 

स्टार्टअप्सना सुरवातीच्या टप्प्यामध्ये अर्थसाहाय्य करण्यासाठी सीड फंड तयार करण्यात आला असून त्यासाठी हा निधी दिला जाणार आहे. सध्या देशामध्ये युवकांना प्राधान्य देणारी एक वेगळी स्टार्टअप व्यवस्था तयार केली जात आहे. नव्या दशकामध्ये या स्टार्टअप्सला आम्ही एक नवी ओळख देऊ असे मोदी म्हणाले. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या संमेलनाचा आज समारोप झाला. मोदींनी यावेळी बिमस्टेकचे (बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टिसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन) सदस्य असणाऱ्या देशांमधील युवा संशोधकांशी देखील संवाद साधला. 

मोदी म्हणाले 
स्टार्टअप इंडियासमोर अनेक आव्हाने होती 
सर्वात मोठी स्टार्टअप इको सिस्टिम भारतात 
आज देशात १४ हजारांवर स्टार्टअप सक्रिय 
स्टार्टअपमध्ये भविष्य बदलण्याची संधी 
देशातील तरुणाई सध्या स्टार्टअपवर खूष 
स्टार्टअप इंडियाला पाच वर्षे पूर्ण झाली 
हे दशक डिजिटल क्रांतीचे आहे 

छोट्या शहरांतील स्टार्टअप्स कौतुक 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छोट्या शहरांमधील स्टार्टअप्सचे देखील कौतुक केले. आज ज्या स्टार्टअप्सचा गौरव करण्यात आला त्यातील आठ हे छोट्या शहरांतील आहेत. प्रत्येक राज्य स्टार्टअपमध्ये भागीदार झाले आहे. स्थानिक पातळीवरील संधी लक्षात घेऊन आम्ही स्टार्टअप्सला प्रोत्साहन देत आहोत. देशातील ८० टक्के जिल्हे याचा घटक बनले असून ४५ टक्के स्टार्टअप्स हे छोट्या शहरांतील आहेत असेही मोदींनी सांगितले. 

शेतीला बूस्टर डोस 
शेतीशी निगडित पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून त्यामुळे देखील स्टार्टअप्सला संधी मिळतील असे मोदींनी सांगितले. नव्या संकल्पनांमधून स्टार्टअप्सचा जन्म होतो आहे. यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रांती येते आहे. प्रत्येक समस्या एका नव्या स्टार्टअप्सला जन्म देते आहे असेही मोदी यांनी सांगितले. 

स्टार्टअप्स चॅम्पियन्स’ टीव्हीवर झळकणार 
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ‘स्टार्टअप्स चॅम्पियन्स’ या दूरचित्रवाणीवरील विशेष कार्यक्रमाला देखील सुरुवात करण्यात आली. दूरदर्शनवरून या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येईल. बारा आठवड्यांचा हा विशेष कार्यक्रम असून त्याचा प्रसारण कालावधी साधारणपणे एक तासांचा असेल. दूरदर्शनवरून रविवारी सायंकाळी सहा वाजता, डीडी न्यूज आणि डी.डी इंडिया या वाहिन्यांवरून शनिवारी अनुक्रमे रात्री नऊ आणि दहा वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून दोन उमेदवारांची चर्चा

SCROLL FOR NEXT