देश

सीबीआय वादात पंतप्रधानांचा हस्तक्षेप

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांमध्ये जुंपलेले भांडण चव्हाट्यावर आले आहे. यामुळे सरकारची होणारी नाचक्की थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप केला असून दोन्ही अधिकाऱ्यांना पाचारण करून खुलासा मागविला. दरम्यान, याप्रकरणात सीबीआयने आपल्याच संस्थेतील उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक केल्यामुळे खळबळ उडाली असून विरोधकांनी यानिमित्ताने सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. 

सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या विरोधातील लाचखोरीच्या आरोपांसंदर्भात सीबीआयने कारवाईस सुरवात केली असून अस्थाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करताना याच प्रकरणात सीबीआयचे उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांना आज अटक करण्यात आली. मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्याशी संबंधित प्रकरणात चौकशी करत असताना एक आरोपी सतीश साना याच्याकडून अस्थाना यांनी लाच घेतल्याचा आरोप आहे. दोन महिन्यांपूर्वी अस्थाना यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांकडे आणि केंद्रीय दक्षता आयोगाला पत्र लिहून सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्याविरुद्ध लाचखोरीची तक्रार केली होती. त्यात दहा प्रकरणांचा उल्लेखही केला होता. मात्र, अस्थाना यांनी सीबीआय संचालक वर्मा यांच्याविरुद्ध तक्रार केली असली तरी सीबीआयने अस्थाना यांचे आरोप फेटाळून लावल्यामुळे या संस्थेमध्ये आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक रंगली आहे. 

सीबीआयने अस्थाना यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, अस्थाना आणि साना यांच्यातील कथित व्यवहारातील मध्यस्थ मनोज प्रसाद याला 16 ऑक्‍टोबरला अटक केली होती. भारतीय पोलिस सेवेतील गुजरात केडरचे अधिकारी राकेश अस्थाना हे ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार, फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्या याच्याविरोधातील गुन्हाची चौकशी यासारखी प्रकरणे हाताळणाऱ्या सीबीआयच्या विशेष तपास पथकाचे प्रमुख असून मोईन कुरेशी प्रकरणदेखील त्यांच्याचकडे होते. यासाऱ्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संचालक अलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांना पाचारण करून खुलासा मागविला. मात्र, पंतप्रधानांसमवेत दोन्ही अधिकाऱ्यांच्या भेटीचा तपशील समजू शकला नाही. 

राहुल यांचा आरोप 
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी अस्थानांवरील लाचखोरीच्या आरोपांच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटा काढण्याची संधी साधली. तसेच सीबीआयसारखी संस्था नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोपही केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT