PM Modi addresses nation on International Yoga Day 
देश

योगामुळे प्रतिकारशक्ती वाढते; कोरोनाशी लढण्यासही होईल मदत : पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे जग योगाला पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्यानं घेत आहे. कोरोनामुळे प्रतिकारशक्ती वाढत असून कोरोनाला हरवण्यात मदत मिळते. योगाची अनेक आसनं आहेत. जी आपल्या शरीराची शक्ती वाढवतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जगावर करोनाचं संकट ओढवलेलं असताना जगभरात सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

२०१५ मध्ये २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज (ता. २१) सहावा योग दिवस साजरा होत आहे. यानिमित्तानं बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. ते म्हणाले, योग दिन हा एकात्मतेचा दिवस आहे. जो आपाल्याला जोडतो. सोबत आणतो तोच तर योग आहे. लोकांच्या योगाविषयी उत्साह वाढत आहे. यावर्षी योगाचं ब्रीद घरातच योग, कुटुंबासोबत योग आहे. आज सगळे कुटुंबासोबत योग करत आहे. योगाच्या माध्यमातून सगळे एकत्र येतात, तेव्हा संपूर्ण घरात ऊर्जेचा संचार होता'.

कोरोना विषाणू आपल्या श्वसन संस्थेवर हल्ला करतो. श्वसन संस्था अधिक सक्षम करण्यासाठी योगाची मोठी मदत होते. यासाठी अनुलोम विनुलोम प्राणायम आहे. प्राणायमाचे असंख्य प्रकार आहेत. योगाची ही आसनं श्वसन संस्था मजबूत करण्यासाठी मदत करते. त्यामुळे प्रत्येकानं प्राणायमाचा दैनंदिन आयुष्याचा भाग बनवावं. करोना झालेल्या लोकांनाही यातून बाहेर पडण्यासाठी ताकद मिळत आहे. योगामुळे मानसिक शांती मिळते. संयम व सहनशक्तीही मिळते, असेही मोदी म्हणाले.

कितीही वाईट परिस्थिती असली तरीही क्रियाशील राहणे. हार न माननं हे योगामुळे आपल्या आयुष्यात ऊर्जा मिळते. योग करणारी व्यक्ती कधीही घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहणे हेच तर योगा आहे. योगा सर्व भेदभावांच्या वर आहे. तो कुणीही करू शकतो. योगाच्या माध्यमातून समस्याच्या निराकरणाची गोष्ट करत आहोत. योगामुळे जीवनात अधिक योग्य बननण्याची क्षमता प्राप्त होते, असेही मोदींनी सांगितले आहे. जगावर कोरोनाचं संकट ओढवलेलं असताना योग योगामुळे आपलं मानसिक व शारीरिक आरोग्य अधिक सुदृढ बनतं. त्यामुळे प्रत्येकानं व्यायाम करण्याबरोबरच योगालाही आयुष्याचं भाग बनवावं, असे आवाहनही मोदींनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT