PM Modi 
देश

PM Modi Speech : वैद्यकीय शिक्षणातील 75,000 जागा वाढवणार; PM मोदींची स्वातंत्र्यदिनी घोषणा

Independence Day Speech 2024 : डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातील मुलांना विदेशात शिक्षणासाठी जावं लागतं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Independence Day 2024 Marathi News : डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातील मुलांना विदेशात शिक्षणासाठी जावं लागतं आहे. यासाठी त्यांना कुठल्याही देशांमध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागत आहे. यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत आहे. त्यामुळं आता येत्या पाच वर्षात ७५,००० जागा वाढवण्यात येतील, असं सरकारनं निश्चित केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन भाषण करताना जाहीर केलं.

पंतप्रधान म्हणाले, "वैद्यकीय शिक्षणासाठी आमची मुलं देशाबाहेर जात आहेत. यामध्ये जास्त करुन मध्यवर्गीय कुटुंबातील मुलं आहेत, यासाठी त्यांचे लाखो करोडो रुपये खर्च होतात. सुमारे २५,००० तरुण प्रत्येक वर्षी मेडिकलच्या शिक्षणासाठी परदेशात जावं लागतं. कधी कधी अशा देशात जावं लागतं की मी विचार केला तर हैराण व्हायला होतं. त्यामुळं गेल्या १० वर्षात आम्ही मेडिकलच्या जागा वाढवून त्या १ लाख केल्या. त्यामुळं आम्ही हे निश्चित केलं आहे की येत्या पाच वर्षात मेडिकल क्षेत्रात ७५,००० नव्या जागा तयार केल्या जातील"

विकसित भारत २०४७ मध्ये 'स्वस्थ भारत'ही व्हायला हवा. या स्वस्थ भारतासाठी आजच्या मुलांच्या पोषणावर आजपासूनच लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळं विकसित भारताची जी पहिली पिढी आहे, त्यांच्याकडं विशेष लक्ष देऊन पोषणचं एक अभियान सरकारनं चालवलं आहे. यासाठी आम्ही 'राष्ट्रीय पोषण मिशन' सुरु केलं आहे, असंही मोदींनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

SCROLL FOR NEXT