PM Modi ISRO eSakal
देश

PM Modi in Bengaluru : 'जय विज्ञान, जय अनुसंधान'.. पंतप्रधान मोदी बंगळुरूमध्ये दाखल; इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटणार

Chandrayaan 3 : 'चांद्रयान-3'चं यशस्वी लँडिंग पार पडलं, तेव्हा पंतप्रधान मोदी ब्रिक्स समिटसाठी दक्षिण आफ्रिकेत होते.

Sudesh

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस दौऱ्यावरुन भारतात परतले आहेत. ते थेट बंगळुरू विमानतळावर दाखल झाले. ते थेट इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेऊन, त्यांचं अभिनंदन करणार आहेत.

23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग करून भारताने विक्रम केला होता. यावेळी पंतप्रधान मोदी ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यांनी ऑनलाईन हे लँडिंग पाहिलं होतं, आणि इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन देखील केलं होतं.

विमानतळावर साधला नागरिकांशी संवाद

पंतप्रधान मोदींनी सकाळी बंगळुरू विमानतळाबाहेर नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. पंतप्रधानांनी यावेळी 'जय विज्ञान जय अनुसंधान' अशी घोषणाही केली. "(चांद्रयान-3 चं लँडिंग झालं तेव्हा) मी दुसऱ्या देशात होतो, मात्र मी स्वतःला थांबवू शकत नव्हतो. त्यामुळे मी ठरवलं, की भारतात आल्यानंतर पहिल्यांदा बंगळुरूला जाईल. सर्वात आधी त्या वैज्ञानिकांना नमन करेल."

"आज मी सकाळी लवकर येणार असल्यामुळे इथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली होती, की सध्या प्रोटोकॉल फॉलो करण्याची गरज नाही. मी येऊन वैज्ञानिकांना भेटून जाईल. मित्रांनो, ही वेळ इथं बोलत बसण्याची नाही, कारण माझं मन त्या वैज्ञानिकांना भेटण्यासाठी आतुर आहे." असंही पंतप्रधान म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Ambedkar Cultural Hall: आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्ताराला स्थायी समितीची मंजुरी; २५ कोटींच्या निधीसाठी राज्य सरकारकडे मागणी

Pune Hotmix Plant : डांबरटंचाईवर उपाय: पुणे महापालिकेकडून हॉटमिक्स प्लांटसाठी १४ कोटींची मंजुरी, खड्डे दुरुस्तीला वेग

MahaRERA Ruling: महारेरा : विकसकाला घरखरेदीदाराची परवानगीशिवाय फ्लॅट बुकिंग रद्द करण्यास मज्जाव; उशिरा ताबा दिल्यास व्याज देण्याचा आदेश

Pune domestic violence FIR: मानपान व मोटार न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; पतीसह चौघांविरुद्ध नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT