PM Modi Portrait eSakal
देश

PM Modi Portrait : तरुणीने काढलं पंतप्रधानांचं स्केच; भाषण सुरू असताना मोदींनी पाहिलं अन् लगेच घेतलं मागवून.. व्हिडिओ समोर

या सभेमध्ये बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका केली. काँग्रेस स्वतःला भगवान श्रीरामापेक्षा मोठी समजते असं ते यावेळी म्हणाले.

Sudesh

PM Modi in Chhattisgarh : पंतप्रधान मोदी आज छत्तीसगडमध्ये भाजपचा प्रचार करत आहेत. यावेळी प्रचारसभेत त्यांचं भाषण सुरू असताना अचानक त्यांचं लक्ष गर्दीमधील एका मुलीकडे गेलं. या मुलीने पंतप्रधान मोदींचं स्केच आपल्या हातात धरलं होतं. ती दोन्ही हात उंचावून मोदींना हे स्केच दाखवत होती. यानंतर पंतप्रधानांनी एसपीजी सुरक्षारक्षकांकडून हे पोर्ट्रेट मागवून घेतलं. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

व्हिडिओमध्ये दिसतंय, की या मुलीला पाहून पंतप्रधान आपलं भाषण थांबवतात, आणि तिला काय हवं आहे हे विचारतात. त्यावर हे पोर्ट्रेट मला तुम्हाला द्यायचंय असं ती मुलगी म्हणते. त्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणतात, की कुणीतरी आमच्या एसपीजी गार्ड्सपर्यंत ते पोर्ट्रेट पोहोचवा.

यानंतर ती मुलगी आपलं स्केच एका महिला सुरक्षा अधिकाऱ्याकडे देते. तेवढ्यात पंतप्रधान मोदी या मुलीला पोर्ट्रेटच्या मागे आपलं नाव आणि पत्ता लिहायला सांगतात. मी तुला नंतर नक्की पत्र लिहेल, असंही मोदी या मुलीला म्हणतात. यानंतर दुसऱ्या बाजूला आणखी एक व्यक्ती आपण तयार केलेलं पंतप्रधानांचं स्केच दाखवते. पंतप्रधान मोदी ते पाहून भारावून जातात.

काँग्रेसवर टीकेची झोड

दरम्यान, या सभेमध्ये बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका केली. काँग्रेस स्वतःला भगवान श्रीरामापेक्षा मोठी समजते. तसंच, व्होट बँक पॉलिटिक्स आणि तुष्टीकरण हे काँग्रेसच्या डीएनएमध्ये असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

Viral Indian Wedding Funny Moment : या नवरदेवानं तर हद्दच केली! लग्नात 'चमकायच्या' नादात अंगालाच गुंडाळली लाईटिंग; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Shani Gochar 2026: 21 मार्चपासून शनि नक्षत्र गोचर! ‘या’ 3 राशींचा सुरू होणार गोल्डन टाईम

IPL 2026 Tickets: मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स अन् RCB सह सर्व संघांची तिकिटं कुठे खरेदी करता येणार? किंमत किती असणार?

Equestrian Statue: बीबीदारफळमध्ये मध्यरात्रीच उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा; हटविण्यास ग्रामस्थांचा विरोध, पाेलिसांशी वादावादी!

SCROLL FOR NEXT