PM Modi 
देश

PM Modi at Bikaner: राहुल गांधींच्या 'मोहब्बत की दुकान'ला PM मोदींचं उत्तर; म्हणाले, 'लूट की...'

राजस्थानात PM मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

बिकानेर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'मोहब्बत की दुकान' या कॅम्पेनला आता PM मोदींनी उत्तर दिलं आहे. राजस्थानातील बिकानेर इथं सभेत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना काँग्रेस म्हणजे 'लूट की दुकान, झूठ का बझार' असं म्हटलं आहे. (PM Modi at Bikaner Rajasthan PM Modi reply to Rahul Gandhi Muhabbat Ki Dukan Campain)

मोदी म्हणाले, राजस्थानचे शेतकरी काँग्रेसच्या सरकारला वैतागले आहेत. जेव्हापासून काँग्रेसचं सरकार राजस्थानात आलंय त्यांनी काय केलंय? गेल्या चार वर्षात काँग्रेस पक्षात अंतर्गत कुरघोडीच सुरु आहेत. प्रत्येकजण एकमेकाचा पाय ओढतोय. केंद्रानं राजस्थानसाठी अनेक योजना पाठवल्या पण काँग्रेसनं त्या राबवल्या नाहीत. काँग्रेसनं राजस्थानच्या समस्यांकडं कधीही लक्ष दिलं नाही. काँग्रेस म्हणजे 'लूट की दुकान, झूठ का बझार' आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान भाजपवर हल्ले चढवले होते. यामध्ये त्यांनी "नफरत की बझार मे मोहब्बत की दुकान खोल रहा हूं" अशा शब्दांत सातत्यानं टीका करत होते. यानंतर कर्नाटकच्या निकालानंतर त्यांनी PM मोदींच्या प्रचारावर थेट हल्ला करत "नफरत का बाझार बंद हो गया, अब मोहब्बत की दुकान खुल गई है" अशा शब्दांत डिवचलं होतं. त्यानंतर सातत्यानं राहुल गांधींकडून 'मोहब्बत की दुकान' हे कॅम्पेन चालवलं जात होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: आता पालकांना मोबाईलवर दिसणार शाळेची बस; महाराष्ट्रात नवे नियम लागू, नियम न पाळल्यास परमिट रद्द होणार

FDA Crackdown: एफडीए कारवाईवर उच्च न्यायालयाची झापड; पंचतारांकित हॉटेलला दिलासा, परवाना निलंबन पुनर्विचाराचा आदेश

Gangapur Water Supply: नऊ वर्षांनंतर गंगापूरचे जलशुद्धीकरण केंद्र सुरू; वाढत्या लोकसंख्येसाठी ८.५ एमएलडी नवीन पाणीपुरवठा योजनेची तयारी

मुलीच्या प्रेमविवाहाचा राग; तरुणाला बेदम मारहाण, जळत्या चितेवर फेकून दिलं...

Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक कुटुंबासाठी स्वतःची स्वप्नं ठेवतात बाजूला; पण नशीब त्यांना उशिरा का होईना देतं मोठं फळ

SCROLL FOR NEXT