PM Modi ANI
देश

...म्हणून लोकांनी मला पंतप्रधान केलं - PM मोदी

सकाळ डिजिटल टीम

कोणत्याही बँकेत घोटाळा झाला की लोक आमचा गळा पकडायचे; पंतप्रधान मोदींनी सांगितली गुजरातचा मुख्यमंत्री असतानाची आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान भवनात आयोजित केलेल्या डिपॉझिटर्स फर्स्ट या कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, देशातील कोणत्याही समस्या विक्राळ रुप धारण करण्यापासून रोखण्यासाठी त्याच्यावर उपाय हाच पर्याय आहे. अनेक दशकांपासून असलेल्या समस्यांवर अडचणी शोधून आमचे सरकार दिलास देत आहे. आतापर्यंत देशात कोणतीही बँक बुडाली तर लोकांजवळ पश्चातापाशिवाय काहीही नसायचं. आता त्यांना बँक बुडाली तरी पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळेल.

दिल्लीत बोलताना मोदी म्हणाले की, मला ते नीट आठवतं. मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी कोणत्याही बँकेत घोटाळा झाला की, लोक आमचा गळा धरायचे. एकतर निर्णय भारत सरकारच्या किंवा बँकेच्या हातात असायचा. पण लोक मुख्यमंत्र्यांना धरायचे. आमच्या पैशांचं काहीतरी करा. त्यावेळी अनेक समस्या होत्या. त्यांचं दु:खही स्वाभाविक होतं.

मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा भारत सरकारला सतत विनंती करत होतो की, १ लाख रुपयांची रक्कम वाढवून ५ लाख रुपये करायला हवी. जास्ती जास्त कुटुंबांचे समाधान व्हावं अशी इच्छा होती. पण माझं बोलणं ऐकलं नाही, त्यांनी केलं नाही त्यामुळे लोकांनी मला निवडलं, मला इथे पाठवलं आणि मी त्यांची इच्छा पूर्ण केली असं मोदींनी यावेळी म्हटलं. देशात वर्षानुवर्षे एक प्रवृत्ती होती की समस्या टाळायची. आताचा भारत समस्या सोडवण्यावर भर देतो. समस्यांना टाळत नाही असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

भारतात बँक डिपॉझिटर्ससाठी विम्याची व्यवस्था ६० च्या दशकात तयार करण्यात आली होती. पहिल्यांदा बँकेत जमा रक्कमेपैकी फक्त ५० हजार रुपयांपर्यंतच्या रकमेची हमी दिली जात होती. ती वाढवून एक लाख रुपये करण्यात आली होती. म्हणजे बँक बुडाली तर डिपॉझिटर्सना फक्त एक लाख रुपयेच मिळण्याची तरतूद होती. आम्ही ही रक्कम वाढवून ५ लाख रुपये केली. जिथं आधी पैसे परत मिळण्यासाठीची मुदत नव्हती तिथं आमच्या सरकारने ९० दिवसांच्या आत ते परत देण्याचा नियम तयार केला असेही मोदी यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

Latest Marathi News Update: नेक्सो सेंटर ड्रग्स पार्टी प्रकरण; आनंद पटेल कल्याणहून अटकेत

स्वतः वाघ्या म्हणून काम केलं, महिलांचं शोषण जवळून पाहिलं; दिग्दर्शक अभिषेक जावीरने सांगितला 'फुला'चा थरार!

Beed News: परफेक्ट च्या शोधात अनेक जण रिजेक्ट; तरुणींच्या अटींमुळे तरुणांचे वय चालले वाढत; शेतकरी मुलांना नकारच

SCROLL FOR NEXT