PM Modi's upcoming China visit marks a significant diplomatic move post-Galwan clash, raising expectations for renewed India-China dialogue.  esakal
देश

PM Modi China Visit: मोठी बातमी! गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच चीन दौऱ्यावर जाणार

PM Modi plans first China visit after Galwan clash: जाणून घ्या, नेमकं काय आहे कारण आणि नेमका कधी असणार आहे हा दौरा?

Mayur Ratnaparkhe

PM Modi’s First Visit to China Since Galwan Clash: भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष उफाळल्यानंतर आता पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस मोदींचा हा परदेश दौरा असणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी आपल्या या परदेश दौऱ्यात जपान आणि चीन या देशांना भेट देतील. यामध्ये जपानचा त्यांचा दौरा द्विपक्षीय आहे, तर चीनचा दौरा एससीओ बैठकीत सहभागी होण्याची असणार आहे, अशी अपडेट समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार पंतप्रधान मोदी ३० ऑगस्ट रोजी जपानला पोहचणार आहेत. या ठिकाणी ते जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या बैठकीत भारत आणि जपानमधील धोरणात्मक, आर्थिक आणि तांत्रिक भागीदारी अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

तर जपान दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी हे थेट चीनला रवाना होणार आहेत. मोदी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत चीनमधील तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या(SCO) परिषदेत सहभागी होतील. खरंतर गलवानमधील उफाळलेल्या संघर्षानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच चीन दौरा असणार आहे.

या दौऱ्यात एससीओच्या सदस्या देशांसोबत प्रादेशिक सुरक्षा, दहशतवाद आणि व्यापार यासारख्या मुद्य्यांवर चर्चा केली जाणार आहे. शिवाय, भारत आणि चीन संबंधांमध्ये स्थिरता आणि संवाद पुनर्संचयित करण्याचाही प्रयत्न केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : ''...त्यावेळी आज आपणच पेरलेल्या विषाची जाणीव त्यांना होईल, पण वेळ मात्र गेलेली असेल''

ENG vs IND: टीम इंडियाने बुमराहशिवाय दोन्ही कसोटी जिंकल्या! सचिन तेंडुलकर म्हणाला, 'त्याने सुरुवात चांगली...'

Trump Tariff India Response: ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफवर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका अन् दिलं सडेतोड प्रत्युत्तर!

Tutari Express: तुतारी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा खोळंबा, वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

Virar News : अर्नाळा किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवले आठ जणांचे प्राण; माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला जीवरक्षकांचा सत्कार

SCROLL FOR NEXT