PTI
देश

मेडल मोदीजी जीतकर लाये है?; सोशल मीडियावर संताप

सकाळ वृत्तसेवा

Tokyo Olympics 2020 : कोरोनाच्या संकटात पार पडलेल्या जगातील मानाच्या स्पर्धेत दिमाखदार कामगिरी केल्यानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. दिल्लीच्या विमानतळावर भारतीय खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले. दिल्लीतील हॉटेल अशोकामध्ये पदक विजेत्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) sports authority of-india कडून खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या स्टेजवर ऑलिम्पिकवीराच्या सत्काराचे बॅनर लावले होते. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो होता. तर खेळाडूंचे फोटो फारच छोट्या आकाराचे होते. या कारणामुळे नेटकऱ्यांनी मोदींना ट्रोल केलं आहे. फोटो इतके छोटे होते की क्रायक्रमस्थळाच्या शेवटून दिसतही नव्हते. यामुळे नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला होता. सोशल मीडियावर मेडल मोदीजी जीतकर लाये है? हे वाक्य ट्रेंड करत होतं. नेटकरी कार्यक्रम स्थळाचा फोटो पोस्ट करत आपला संताप व्यक्त करत होते.

या बॅनरवर बॉक्सर विजेंद्र सिंग यानेही ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. यामध्ये तो म्हटलेय की, सगळं काही जनसंपर्क आहे, जनसंपर्क सगळं काही आहे.

विजेंद्रशिवाय यवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनीही आपला राग व्यक्त केला आहे. ट्विटरवरुन हा फोटो शेअर करत, “पदक मोदीजींनी जिंकून आणलंय का?,” असा खोचक टोला लगावला आहे.

यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नवा इतिहास रचलाय. आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक पदकांची कमाई भारतीयांनी करुन दाखवलीये. नीरज चोप्राच्या गोल्डसह मीराबाई चानू आणि रविकुमार दाहियाचे रौप्य आणि बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू, महिला बॉक्सर लवलिना, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि भारतीय पुरुष हॉकी संघाने मिळवलेल्या कांस्य पदकासह भारताने एकूण 7 पदके पटकावली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT