PM Modi Discusses COVID-19 Situation And Vaccine To Cure It With Bill Gates
PM Modi Discusses COVID-19 Situation And Vaccine To Cure It With Bill Gates 
देश

...म्हणून बिल गेट्स यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून भारतातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत काल (ता. १४) गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बिल गेट्स यांनी कोरोनाच्या संकटामुळे जागतिक स्तरावर पडणारा  सामाजिक आणि आर्थिक ताण किमान राहिल यासंदर्भात उपाययोजना करताना भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच, भारताच्या भूमिकेमुळे लस निर्मिती, चाचणी आणि सर्वांपर्यंत उपचार पोहचण्यासाठी मार्ग सुखकर होईल, अशी अपेक्षाही बिल गेट्स यांनी व्यक्त केली. 


यापूर्वी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लढाई सर्वांनी एकत्र मिळून लढली पाहिजे, असं म्हटलं होतं.पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोनाच्या समस्या आणि या आजाराशी लढण्याच्या उपाययोजना यावर चर्चा केली. तसंच यावेळी मोदी यांनी कोरोनाविरोधात भारतानं केलेल्या उपाययोजनांचीही त्यांना माहिती दिली. भारत आपल्या सर्व नागरिकांच्या मदतीनं कोरोनाविरोधातील ही लढाई कठोरपणे लढत आहे. कोरोनाशी निगडित सर्व माहिती आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो आहोत. याचा लाभ जगभरातील अन्य देशही घेऊ शकतात. अशा कठीण परिस्थितीत कोणतेही पूर्वग्रह न ठेवता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT