ISRO 
देश

750 विद्यार्थिनींच्या मेहनतीने यंदा अंतराळात फडकणार 'तिरंगा'; ISRO चाही पुढाकार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - यावर्षी 15 ऑगस्ट 2018 रोजी देशाच्या 75 व्या वर्षाच्या स्वातंत्र्यदिना निमित्त तिरंगा अवकाशात फडकवला जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. अंतराळात ध्वज फडकवण्याचे पंतप्रधान मोदींचे वचन पूर्ण करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 7 ऑगस्ट रोजी त्यांचे सर्वात छोटे व्यावसायिक रॉकेट, स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSLV) प्रक्षेपित करणार आहे, ज्याद्वारे राष्ट्रध्वज अंतराळात घेऊन जाता येणार आहे.

राष्ट्रध्वज असलेल्या 'गगनयान' वर मानवयुक्त अंतराळ मोहीम सुरू करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदींचे यांचे होते. मात्र या प्रकल्पाला वेळ झाला असल्याने ISRO ला SSLV मोठी मदत होणार आहे. 500 किलोपेक्षा कमी वजनाचे उपग्रह आणि पेलोड पृथ्वीच्या निम्न कक्षेत ठेवण्यासाठी ते विकसित करण्यात आले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ७ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वानऊ वाजता प्रक्षेपण केले जाणार आहे.

'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करण्याच्या दृष्टीकोनातून SSLV 'आझादी SAT' नावाचा सह-प्रवासी उपग्रह घेऊन जाणार आहे. जो देशभरातील 75 ग्रामीण सरकारी शाळांमधील 750 मुलींनी तयार केलेले 75 पेलोड वाहून नेणार आहे. वैज्ञानिक वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण मुलींना त्यांचे करिअर म्हणून अंतराळ संशोधन करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात या प्रकल्पाची खास संकल्पना करण्यात आली होती.

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी नवीन उपग्रहाचे वर्णन "गेम चेंजर" असे ठेवले आहे. इस्रोच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे की, SSLV मिनी, मायक्रो आणि नॅनो उपग्रह (10-500 किलो वजनाचे) 500 किमीच्या प्लॅनर ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित करण्यास सक्षम आणि तयार आहे. पेलोड इमेजिंगसह सुधारित आणि व्यावहारिक उपग्रह डिझाइन आणि विकसित करणे हे SSLV चे उद्दिष्ट आहे. तसेच वनीकरण, जलविज्ञान, कृषी, मृदा आणि किनारपट्टी अभ्यास या क्षेत्रातील महत्त्वाची माहिती प्रदान करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT