PM Modi  Esakal
देश

Parliament Security Breach : संसदेतील घुसखोरीबद्दल PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; तपासाबाबत केलं मोठं विधान

संसदेतील सुरक्षेचा भंग झाल्याच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित कणसे

संसदेतील सुरक्षेचा भंग झाल्याच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पीएम मोदी म्हणाले की, संसद परिसरात झालेली घटना चिंताजनक आहे आणि याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. तपास यंत्रणा या घटनेचे गंभीरतेने चौकशी करत आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी अशा विषयांवर प्रत्येकाने वादविवाद किंवा विरोध टाळावा, असेही पंतप्रधान म्हणाले.

एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले, "संसदेत घडलेल्या घटनेचे गांभीर्य अजिबात कमी लेखू नये. त्यामुळे सभापती गंभीरपणे यासाठी आवश्यक उपाय करत आहेत. तपास यंत्रणा या प्रकरणाचा काटेकोरपणे तपास करता आहेत. यामागे कोण आहे आणि त्यांचा उद्देश काय आहे याच्या तळापर्यंत जाणे देखील तेवढेच आवश्यक आहे. तसेच दुसरीकडे यावर उपाय देखील शोधले गेले पाहिजेत. अशा विषयांवार वादविवाद आणि विरोध करणे टाळले पाहिजे."

संसदेच्या सुरक्षाव्यवस्थेत झालील्या चुकीमुळे विरोधकांकडून मोदी सरकारला धारेवर धरलं जात आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही सभागृहात निवेदन करावं आमि यानंतर संसदेच्या सुरक्षेवर चर्चा केली जावी अशी मागणी केली जात आहे.

प्रकरण काय आहे?

13 डिसेंबर रोजी संसदेत काही लोक घुसल्याचा प्रकार समोर आला होता. व्हिजीटर पास घेऊन आतमध्ये आलेले हे दोघे गॅलरीतून उड्या मारून सभागृहात उतरले , यानंतर त्यांनी बुटांमध्ये लपवलेल्या स्मोक गॅस सभागृहात धूर केला. हे तरूण एकजण लखनऊ येथील सागर शर्मा आणि दुसरा मैसूर येथील मनोरंजन डी असल्याची माहिती समोर आली. दोघांना भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या शिफारसीनंतर पास मिळाले होते.

जेव्हा सभागृहात हे होत असताना तेव्हाच संसदेबाहेर त्यांच्या साथिदारांनी देखील गदारोळ केला. नीलम आणि अमोल शिंदे या दोघांनी संसदेबाहेप स्मॉक गॅस सोडला आणि घोषणाबाजी केली. पोलिसांनी या दोघांना तत्काळ ताब्यात घेतलं.

सहा आरोपी अटकेत...

आतापर्यंत या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आलं आङे. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार ललित झा याने पोलिसांसमोर सरेंडर केलं होतं. दरम्यान पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात यूएपीए कलमांतर्गत एफआयआर दाखल केली आहे. या प्रकऱणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच आठ सुरक्षा रक्षकांना या प्रकरणी सस्पेंड देखील करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT