देश

PM मोदींचं विमान टाळणार अफगाण हवाई क्षेत्र; 'पाक'वरुन जाण्यास मिळाली परवानगी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी चार दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यासाठी निघाले आहेत. मात्र, या दौऱ्यामधील खास गोष्ट अशी आहे की, त्यांचं अमेरिकेकडे जाणारे विमान अफगाणिस्तानमधून जाणाऱ्या हवाई क्षेत्राचा वापर करणार नाहीये.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रावरुन अमेरिकेत जाणार आहेत. यासाठी पाकिस्तान सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये सुरु असणाऱ्या तालिबान संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी भारत सरकारने पाकिस्तानकडून त्यांचं हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी मागितली होती. पाकिस्तानने ही परवानगी दिली आहे.

2019 मध्ये पाकने दिला होता नकार

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या परदेश दौऱ्यासाठी पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास नकार दिला होता. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने हवाई क्षेत्राचा वापर करण्यावर प्रतिबंध लादला होता. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय नागरी उड्डान संघटनेमध्ये याचा कडक निषेध व्यक्त केला होता. हे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन असल्याचा आरोप देखील भारताने लावला होता. तरीही भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या श्रीलंका यात्रेसाठी आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास परवानगी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Floods: पावसाने पाकिस्तान थरथरला; मृतांची संख्या ६५० वर

Mumbai Flood: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर! मिठी नदीत तरूण वाहून जाताना व्हिडिओ समोर तर एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : उजनीतून भीमा नदीत 11हजार 600 क्युसेक विसर्ग

Donald Trump: अमेरिकेत ट्रम्प यांचा थेट कारवाईचा निर्णय; रोजगार आकडेवारीवरून बीएलएस प्रमुखांना दिली हकालपट्टी

PM Modi on Indus Water Treaty : 'सिंधू जल करार'वरून नेहरूंचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र, म्हणाले...

SCROLL FOR NEXT