modi second dose 
देश

'कोरोनाला नमवण्यासाठी लसीकरण हा एक उपाय'; PM मोदींनी घेतला दुसरा डोस

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - देशात कोरोनाविरोधात लढा सुरु असून व्यापक अशा लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी सकाळी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला. दिल्लीतील एम्स रुग्णालयात मोदींनी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला असून ट्विटवरून त्यांनी फोटोही शेअर केला आहे. पंतप्रधान मोदींनी याआधी पहिला डोस एक मार्चला घेतला होता. लोकांच्या मनात लशीबाबत थोडीशी भीती आहे. मोदींनी लस घेऊन नागरिकांना लशीकरणाबाबत आवाहन केलं होतं. यावेळीही त्यांनी नागरिकांना आवाहन केलं असून कोरोनाला नमवायचं असेल तर लसीकरण हाच एक उपाय आहे असं म्हटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मार्चला पहिला डोस घेतला होता. तेव्हा त्यांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा डोस घेतला. मोदींना लस देणाऱ्या दोन नर्सपैकी पी निवेदा या पुद्दुचेरीच्या आणि निशा शर्मा या पंजाबच्या आहेत.

ट्विटरवरून लशीचा दुसरा डोस घेतल्याचं मोदींनी सांगितलं. यात मोदींनी म्हटलं की, कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण हा एक पर्याय आहे. जर तुम्ही लस घेण्यासाठी पात्र असाल तर तुमची लस लवकर घ्या आणि नोंदणी सुरु आहे. 

परीक्षा पे चर्चामधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
‘परीक्षा पे चर्चा’ या वार्षिक संवाद कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांशी चर्चा करताना बुधवारी मोदींनी अनेक प्रश्नांना उत्तर दिली. मोदी म्हणाले की, ‘‘ कोरोनाने विद्यार्थ्यांना अनेक जीवनावश्‍यक वस्तूंची किंमत लक्षात आणून दिली. या संसर्गाने अनपेक्षित गोष्टींचा सामना कसा करायचा हे शिकविले. या संसर्गामुळे लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागले असले तरी कौटुंबिक जिव्हाळा मात्र वाढला. या संसर्गाच्या काळामध्ये आपल्याला अनेक गोष्टी गमवाव्या लागल्या पण आपण अनेक गोष्टी प्राप्त देखील केल्या. जे लोक आणि गोष्टी यांना तुम्ही गमावले त्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये पार मोठी भूमिका पार पाडली आहे. ज्या गोष्टी आणि लोकांना तुम्ही दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून स्वीकारले आहे, त्यांचे महत्त्वही तुम्हाला समजले असेल.’’ कोरोनामुळे मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये देशव्यापी लॉकडाउन सुरू झाला. यामुळे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमाकडे वळावे लागले. अनेक राज्यांनी मागील वर्षी शाळा सुरू केल्या पण संसर्ग वाढल्याने त्या पुन्हा बंद कराव्या लागल्या, असेही मोदींनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katol Explosion : काटोलमध्ये बारूद कंपनीत मोठा स्फोट; १७ कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, म्हणाले...

Rally of Maharashtra 2026 : नाशिकमध्ये 'रॅली ऑफ महाराष्ट्र'चा थरार! मस्कारेहास डीन विजयाचा प्रबळ दावेदार, तर आदित्य ठाकूर स्पर्धेतून बाद

Pune : सायकल ट्रॅक निघाले पण झाडं रस्त्यातच; वाहतुकीला अडथळा, अपघाताची शक्यता

Nashik News : नाशिकमध्ये 'विरासत'चा जागर! अक्षय कुमारची रिक्षामधून ग्रँड एन्ट्री, एमईटी उत्सव जल्लोषात

Mohol News: मोहोळ येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकरणी बारा संशयीत निष्पन्न करण्यात मोहोळ पोलीसांना यश

SCROLL FOR NEXT