Turkey Earthquake Sakal
देश

Turkey Earthquake : भूज भुकंपाच्या आठवणींनी PM मोदी भावूक; म्हणाले, "मी समजू शकतो..."

२००१ मध्ये गुजरातमधल्या भूजमध्ये भूकंपात जवळपास २० हजार नागरिकांचा मृत्यू झाला. तर दीड लाखांहून अधिक नागरिक जखमी झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

तुर्की आणि सिरियामध्ये नुकताच भीषण भूकंप झाला. या भूकंपाबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. पंतप्रधान मोदींना या भूकंपानंतर गुजरातमधल्या भूजमध्ये झालेल्या भूकंपाची आठवण झाली. या भूकंपातही हजारो लोकांचे बळी गेले होते.

पंतप्रधान मोदी आज भाजपाच्या खासदारांच्या बैठकीमध्ये बोलत होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी ही बैठक झाली. यामध्ये बोलताना त्यांनी २००१ च्या भूज भूकंपाची आठवण काढली. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असताना या भूकंपातून लोकांना वाचवण्यात आलेल्या आव्हानांविषयी त्यांनी भाष्य केलं आहे.

भारताने तुर्की आणि सिरीयाला मदत पाठवली असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. तुर्की आणि सिरीयामध्ये जवळपास ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्यामुळे ४००० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कीमध्ये जे काही चाललंय, ते आपण चांगलं समजू शकतो, जाणू शकतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहे.

२००१ मध्ये गुजरातमधल्या भूजमध्ये भूकंपामुळे हाहाकार माजला होता. जवळपास २० हजार नागरिकांचा मृत्यू झाला. तर दीड लाखांहून अधिक नागरिक जखमी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education Decision: राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! आरटीई प्रवेशाची अंतराची अट अखेर रद्द; पालकांना २५ मार्चपर्यंत अर्जाची संधी!

CJI SuryaKant यांचा मोठा निर्णय! कोर्टातील ‘काळे कोट’ संपणार? नावही बदलणार, मोठा बदल लवकरच!

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या तपोवन वृक्ष तोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Beed Forest Department News: वन विभागात टक्केवारीचा खेळ; बोगस बिलांमुळे कोट्यवधींचा गैरव्यवहार?; सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आरोप

Deepak Dalvi Death : मराठी अस्मितेचा ढाण्या वाघ हरपला! म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन; काही महिन्यांपूर्वीच शरद पवार, जयंत पाटलांनी घेतली होती भेट

SCROLL FOR NEXT