PM Modi ISRO Speech eSakal
देश

PM Modi : इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतुक, कित्येक मोठ्या घोषणा; पाहा पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे!

Chandrayaan-3 : चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आज पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांचं भेटून अभिनंदन केलं.

Sudesh

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेतली. 'चांद्रयान-3' मोहीम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांनी वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करुन भारताने मोठा विक्रम केला होता.

ज्या दिवशी ही मोहीम पार पडली, तेव्हा पंतप्रधान मोदी ब्रिक्स समिटसाठी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे हा ऐतिहासिक क्षण पाहिला होता. यावेळी त्यांनी आपण भारतात आल्यावर पहिल्यांदा इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेणार असल्याचं मोदींनी घोषित केलं होतं.

आपलं वचन पाळून, आज सकाळी पंतप्रधान मोदी ग्रीसवरुन थेट बंगळुरूमध्ये दाखल झाले. याठिकाणी असलेल्या इस्रोच्या मुख्यालयात जाऊन त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. यावेळी बोलताना PM मोदी अतिशय भावनिक देखील झाले होते. तसंच, पंतप्रधानांनी यावेळी काही मोठ्या घोषणाही केल्या.

पंतप्रधान झाले भावूक

आपल्या भाषणात पंतप्रधानांनी वैज्ञानिकांच्या कार्याला सलाम केला. तसंच, मी अगदी सकाळी इथं आल्यामुळे तुम्हाला आणखी ओव्हरटाईम करावा लागला असेल, अशी मिश्किल टिप्पणी देखील त्यांनी केली. हे बोलतानाच ते पुढे भावूक देखील झाले.

शिवशक्ती अन् तिरंगा पॉइंट

भारताचं चांद्रयान-3 चंद्रावर ज्याठिकाणी लँड झालं आहे, त्या ठिकाणाला आता 'शिवशक्ती पॉइंट' म्हटलं जाणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी घोषित केलं. यासोबतच, चांद्रयान-2 मधील विक्रम लँडर ज्याठिकाणी क्रॅश झालं होतं, त्या जागेला 'तिरंगा पॉइंट' म्हटलं जाणार असल्याचं मोदींनी जाहीर केलं.

नॅशनल स्पेस डे

भारताने चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडून इतिहास रचला आहे. ही ऐतिहासिक कामगिरी 23 ऑगस्ट रोजी पार पडली. त्यामुळे, इथून पुढे या दिवसाला 'नॅशनल स्पेस डे', म्हणजेच राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरं केलं जाईल अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना केली.

महिला वैज्ञानिकांचं कौतुक

पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना महिला वैज्ञानिकांचं देखील कौतुक केलं. निर्माणापासून ते प्रलयापर्यंत संपूर्ण सृष्टीचा आधार ही नारीशक्ती आहे. चांद्रयान-3 मोहिमेत महिला वैज्ञानिकांची मोठी भूमिका होती, असं ते म्हणाले. यावेळी आपल्या भाषणानंतर त्यांनी महिला शास्त्रज्ञांची भेट घेतली.

चंद्रावर नेलं 'मेक इन इंडिया'

इस्रोच्या वैज्ञानिकांनी 'मेक इन इंडिया' अभियान हे थेट चंद्रापर्यंत नेलं आहे. ही एक मोठी गोष्ट आहे. "तुम्ही एका संपूर्ण पिढीला जागं केलं असून, त्यांच्यावर मोठी छाप सोडली आहे. ही साधारण बाब नाही. भारताचं वैज्ञानिक यश सध्या संपूर्ण जगाला दिसतंय" असं पंतप्रधान म्हणाले.

भारताची स्पेस इंडस्ट्री

"भारत देश, जो पूर्वी 'थर्ड रो' म्हणजेच तिसऱ्या ओळीत गणला जात होता; तो आता 'फर्स्ट रो'मध्ये गणला जातोय. 'थर्ड रो' ते 'फर्स्ट रो' पर्यंतच्या या प्रवासामध्ये 'इस्रो' सारख्या संस्थांचं मोठं योगदान आहे. तज्ज्ञांच्या मते भारताची स्पेस इंडस्ट्री ही 8 बिलियन डॉलर्सवरुन 16 बिलियन डॉलर्स एवढी होईल"; असंही मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! सोमवारी मध्यरात्रीपासून भाववाढीचा निर्णय, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Kalamboli Accident: नवी मुंबईत भरधाव कारचा थरार! डॉक्टरनं पदपथावरील पादचाऱ्यांना चिरडलं; लहान मुलांसह ४ जण गंभीर जखमी

Rahul Gandhi Defamation Case: पुण्यात राहुल गांधी मानहानी खटल्याला कडक कायदेशीर वळण! विशेष कोर्टातील उलटतपासात सात्यकी सावरकरांनी मान्य केला '१० दया याचिकां'चा ऐतिहासिक ताळेबंद

Kannad Accident : मद्यधुंद क्रूझर चालकाने बुलेटला चिरडले; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

Pune Developer Death: बांधकाम व्यावसायिक कपिल गांधी यांचे हृदयविकाराने निधन

SCROLL FOR NEXT