Threat to PM Narendra Modi esakal
देश

PM Modi : मोदींना थोरल्या भावाचा सल्ला, आता त्यांनी...; वाचा काय म्हणाले सोमभाऊ

गुजरातच्या निवडणुकीत मतदानानंतर त्यांनी हे विधान केल्यानं चर्चेचा विषय ठरलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी नुकतचं मतदान पार पडलं, यंदाची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यासाठी आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. यानंतर दीडएक वर्षानंतर लोकसभा निवडणूकही होणार आहे. यासाठी होमग्राऊंडवरची ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची असणार आहे. असं असताना आता मोदींना त्यांच्या घरच्या मंडळींनीच राजकारणातून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे.

मोदींचे थोरले बंधू सोमभाऊ यांनी त्यांना हा सल्ला दिला आहे. गुजरातच्या निवडणुकीत मतदानानंतर त्यांनी हे विधान केल्यानं चर्चेचा विषय ठरलं आहे. (PM Modi got Important advice from his elder Brother Som bhau)

पंतप्रधान मोदींचे थोरले बंधू सोमभाऊ मोदी यांनी सोमवारी अहमदाबाद इथं मतदानाचा हक्क बजावला. अहमदाबादमधील रानीप इथल्या निशान पब्लिक स्कूलमधील केंद्रावर त्यांनी मतदान केलं. या मतदान केंद्रावर पंतप्रधान मोदींनी देखील मतदान केलं. मतदानानंतर सोमभाऊ मीडियाशी बोलले यावेळी पंतप्रधानांनी नुकतीच त्यांची भेट घेतली होती, यावेळी त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेची माहिती देताना ते भावूक झाले.

सोमभाऊ म्हणाले, मी त्यांना सांगितलं की, त्यांनी देशासाठी खूप काम केलंय आता त्यांनी काहीकाळ राजकारणातून ब्रेक घ्यायला हवा. यावेळी त्यांनी गुजरातच्या मतदारांना देखील सल्ला दिला. जनतेनं आपल्या मताचा योग्य वापर करावा.

ज्या पक्षानं देशाच्या विकासासाठी काम केलं आहे अशाच पक्षाला त्यांनी मत द्यायला हवं. २०१४ पासून देशात अशा प्रकारचं काम झालेलं आहे, याकडे लोक दुर्लक्ष करु शकत नाहीत. लोकांनी या कामगिरीवरच मतदान करायला हवं, असं आवाहन त्यांनी गुजरातच्या जनतेला केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT