PM Modi Gets Rs 12 Cr Mercedes Maybach S650 e sakal
देश

पंतप्रधान मोदींच्या दिमतीला १२ कोटींची मर्सिडीज, वाचा वैशिष्ट्ये

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) दिमतीला आता १२ कोटींची मर्सडीज आली आहे. मोदी यापूर्वी दोनवेळा मर्सिडीज-मेबॅक एस 650 (Mercedes-Maybach S650) या गाडीतून फिरताना दिसले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russia President Vladimir Putin) यांना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी नुकतेच हैदराबाद हाऊसमध्ये गेले होते. त्यावेळी ते त्यांच्या नवीन मेबॅक 650 गाडीमध्ये पहिल्यांदा दिसले. त्यानंतर हे वाहन पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या ताफ्यात दिसले. (PM Modi Gets Rs 12 Cr Mercedes-Maybach S650)

काय आहेत वैशिष्ट? -

Mercedes-Maybach S650 Guard हे नवीन मॉडेल आहे. आतापर्यंत लाँच झालेल्या कारमधील सर्वोच्च संरक्षण असणारे हे मॉडेल आहे. एका अहवालानुसार, Mercedes-Maybach ने गेल्या वर्षी भारतात S600 Guard लाँच केले होते, ज्याची किंमत 10.5 कोटी. तसेच आता या S650 मॉडेलची किंमत 12 कोटींपेक्षा जास्त असू शकते. तसेच या गाडीचा वेग हा १६० किमी प्रतितास इतका आहे. कारमध्ये आलिशान इंटीरियर आहे.

सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं वाहन -

भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी जबाबदारी असणारे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) सुरक्षेच्या गरजा ओळखून संरक्षण देत असलेल्या व्यक्तींना नवीन वाहनाची गरज आहे की नाही हे ठरवत असते. या वाहनाचा कमाल वेग १६० किमी प्रतितास इतका मर्यादित आहे. या वाहनाच्या खिडकीचा आतील भाग पॉली कार्बोनेटचा असून कारचा खालचा भाग कोणत्याही प्रकारच्या स्फोटांपासून सुरक्षित ठेवतो. त्यामुळे S650 गार्ड बॉडी आणि खिडक्या हल्ला झाल्यास बुलेटचा देखील सामना करू शकतात. तसेच या वाहनाने प्रवास करणारे व्यक्ती २ मीटर अंतरावर होणाऱ्या स्फोटापासून सुरक्षित असतात. वायू हल्ला झाल्यास त्यापासून देखील संरक्षण मिळतं. बोईंग त्यांच्या AH-64 अपाचे टँक अटॅक हेलिकॉप्टरसाठी जी सामग्री वापरते त्याच सामग्रीपासून र्सिडीज-मेबॅक S650 गार्डची इंधन टाकी बनवली आहे. त्यामुळे उष्णतेमुळे तयार होणारी छिद्रे आपोआप सील करण्यास मदत करते.

दरम्यान, मोदी गुजराते मुख्यमंत्री असताना त्यांनी बुलेटप्रूफ महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये प्रवास केला होता. तसेच 2014 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी BMW 7 सीरीज हाय-सिक्युरिटी वाहनाने प्रवास केला होता. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: पाचोर्‍यातील कृष्णापुरीतील उपद्रवी माकडाला पकडण्यात यश

SCROLL FOR NEXT