देश

PM मोदी पुलावर अडकल्यानंतर नड्डांची काँग्रेसवर आगपाखड

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांची आज पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ही सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने याबाबत एका निवेदनातून माहिती दिली आहे. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर पोहोचला होता, तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचं दिसून आलं. या आंदोलकांमुळे पंतप्रधान जवळपास 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून पडले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही एक मोठी चूक होती,” असे निवेदनात म्हणण्यात आलंय.

"पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि त्यांच्या प्रवासाचा आराखडा पंजाब सरकारला अगोदरच कळवण्यात आला होता. प्रोसिजरनुसार, त्यांना लॉजिस्टिक, सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करावी लागते तसेच ऐनवेळी काही घडल्यास त्यासंदर्भातील योजनाही तयार ठेवावी लागते. मात्र, पंजाब सरकारने यासंदर्भात कसलीही सुरक्षा तैनात केली नव्हती," असंही निवेदनात सांगण्यात आलंय. "या सुरक्षेतील त्रुटींनंतर, पंतप्रधानांना भटिंडा विमानतळाकडे परत घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला," असंही त्यात म्हटलं आहे.

सुरक्षेत कोणतीही त्रुटी नव्हती: पंजाबचे मुख्यमंत्री

एका पंजाबी वाहिनीवरील टीव्ही मुलाखतीत या घटनेवर प्रतिक्रिया देताना पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी (Charanjit Channi ) यांनी म्हटलंय की, “सुरक्षेत कोणतीही चूक नव्हती. पंतप्रधान ज्या मार्गावरुन जाणार होते त्याबाबतच्या आराखड्याची योजना शेवटच्या क्षणी बनवण्यात आली. त्यांना हेलिकॉप्टरने जायचे होते. त्यांच्या रॅलीच्या सुरक्षा व्यवस्थेवर मी रात्री उशिरापर्यंत काम करत होतो. रॅलीसाठी 70,000 खुर्च्या लावण्यात आल्या होत्या पण फक्त 700 लोक आले होते.

दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) यांनीही याबाबत आगपाखड केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, "मतदारांच्या हातून पराभवाच्या भीतीने, पंजाबमधील काँग्रेस सरकारने पंजाबमधील पंतप्रधान मोदीजींच्या कार्यक्रमांना हाणून पाडण्यासाठी शक्य त्या सर्व संभाव्य युक्त्या वापरल्या."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT