PM Modi US Visit eSakal
देश

PM Modi in US : अमेरिकेतून प्रोजेक्ट आणला पण गुजरातला नेला; मायक्रॉनचा 2.7 अरब डॉलरचा प्लांट येणार

संतोष कानडे

Micron to invest in india : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. काल अमेरिकेने बंगळूरु आणि अहमदाबाद येथे दुतावास सुरु करण्याची घोषणा केली आहे. आज अमेरिकेतून मोठी बातमी येत असून अमेरिकेची चिप कंपनी गुजरातमध्ये प्लांट सुरु करणार आहे.

भारताला सेमीकंडक्टर हब बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे. त्यातच मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि अमेरिकेची एक मोठी कंपनी भारतात प्रकल्प सुरु करणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. अमेरिकेची सेमीकंडक्टर कंपनी मायक्रॉन गुजरातमध्ये प्लांट टाकणार आहे. तशी घोषणा कंपनीच्या वतीने करण्यात आलेली आहे.

या प्रकल्पासाठी मायक्रॉन २.७ अरब डॉलर गुंतवणूक करणार आहे. पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यानच ही घोषणा करण्यात आली. अमेरिकन मंत्रिमंडळाने एक नवीन सेमीकंडक्टर टेस्टिंग आणि पॅकेजिंग युनिटसाठी मायक्रॉनला भारतात गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यामध्ये मायक्रॉनचे सीईओ संजय मेहरोत्रा यांच्यासोबत बैठक घेऊन भारतात गुंतवणूक करण्याची मागणी केली, असं मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे. कंपनीकडून जारी करण्यास आलेल्या स्टेटमेंटमध्ये गुजरातमध्ये कंपनी सेमीकंडक्टर टेस्ट आणि असेंबली प्लांट सुरु करणार आहे. दोन टप्प्यांमध्ये हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे.

मायक्रॉन कंपनी ८२.५ कोटी डॉलर गुंतवणूक करणार आहे. बाकीची गुंतवणूक केंद्र आणि राज्य सरकार करणार असल्याची माहिती मिळत आहे. संजय मेहरोत्रा यांनी सांगितलं की, चालू वर्षामध्येच हा प्रकल्प उभारणीचं काम सुरु होईल. भारत सरकार आणि या प्रकल्पामध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT