Rahul Gandhi_PM Modi 
देश

Rahul Gandhi: "पंतप्रधानांना गांभीर्य नाही, लोकसभेत ते निर्लज्जपणे हसत होते"; राहुल गांधींची मणिपूरवरून मोदींवर टीका

PM मोदींनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना मणिपूरवर समाधानकारक उत्तर न दिल्यानं राहुल गांधी त्यांच्यावर टीका केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिलं. पण मणिपूरच्या विषयावर त्यांनी समाधानकारक उत्तर दिली नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच आपल्या सव्वा दोन तासांच्या भाषणात त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना टार्गेट केलं होतं.

यावरुन आता राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधानांवर टीका केली आहे. पंतप्रधानांना मणिपूरच्या विषयाचं गांभीर्य नव्हतं असा आरोपही त्यांनी केला. (PM Modi is not serious about Manipur he was laughing brazenly in Lok Sabha says Rahul Gandhi)

राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधान मणिपूरच्या घटनेवर हसून बोलत होते, जोक्स करत होते, आमची थट्टा करुन बोलत होते, हे त्यांना शोभत नाही. या देशात हिंसा होत असेल त्रास होत असेल तर दोन तास या देशाच्या पंतप्रधानानं थट्टा करायला नको. त्यावेळी विषय काँग्रेस नव्हता, मी नव्हतो तर मणिपूर होता. मणिपूरमध्ये काय होतंय? ते थांबवलं का जाऊ शकत नाही हा विषय आहे.

मी यापूर्वी बोललो नाही पण आता बोलतो आहे. मी १९ वर्षे राजकारणात आहे, मी आपत्ती दरम्यान प्रत्येक राज्यात गेलो आहे. पण आजवर मणिपूरमध्ये जे झालं ते मी आधी कधीही पाहिलेलं नाही"

भारत मातेची हत्या झाल्याचं का म्हणालो?

मी सभागृहात म्हटलं की, "पंतप्रधानांनी अमित शहांनी भारत मातेची हत्या केली. मणिपूरमध्ये भारताला संपवण्यात आलं आहे. हे विधान मी उथळपणे केलं नव्हतं. याचं कारण मी सांगतो, जेव्हा आम्ही मणिपूरमध्ये पोहोचलो तेव्हा मैतेई भागात गेलो आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की, जर तुमच्या सिक्युरिटीमध्ये कोणीही कुकी असला तर आम्ही त्याला मारुन टाकू.

तसेच कुकी भागात गेलो तिथं आम्हाला सांगितलं की तुमच्या मैतेई असेल तर त्याला गोळी मारुन टाकू. यावरुन मणिपूर हे एक राज्य राहिलेलं नाही त्याचे दोन भाग झाले आहेत. राज्याची हत्या झाली असून त्याची चिरफाड केली आहे. म्हणून मी म्हटलं की, भारताची हत्या मणिपूरमध्ये झाली.

पण मी काल पंतप्रधानांना बघितलं की, ते हसत मस्करी करत बोलत आहेत. मला हे कळत नव्हतं की भारताचा पंतप्रधान एका पत्रकाराशी असं कसं बोलू शकतो. आपल्या पंतप्रधानां हे कळतचं नाहीए की देशात काय सुरु आहे" अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या भाषणावर सडकून टीका केली.

पंतप्रधानांना मणिपूरची हिंसा थांबवायची नाही

ते मणिपूरमध्ये का जात नाहीत हे मला माहिती आहे पण इथं कदाचित सांगू शकणार नाही. तुम्ही तिथं जाऊ शकत नाहीत तर कमीत कमी बोला तरी. मणिपूरमध्ये जे होतंय ते भारतीय सेना दोन दिवसात थांबवू शकते. हा तमाशा बंद करायचं ठरवलं तर बंद होईल. पण पंतप्रधान मणिपूरला जाळू इच्छितात त्यांना त्याला वाचवायचं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चित

Safe Investment : FD-RD, म्युच्युअल फंड्स की सोनं? कुठे किती नफा, कुठे किती धोका? गुंतवणूक करण्याआधी हे गणित नक्की समजून घ्या!

रिलीजला महिना झाला अन् शशांक आणि सायली संजीवच्या कैरी सिनेमाची ओटीटीवर होणार एंट्री ! कधी आणि कुठे पाहाल ?

आता फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार गाडी; Suzuki e-Access ची धमाकेदार एन्ट्री, 95 किमी रेंजसह परवडणारी किंमत

Amravati Municipal Election 2026 : अमरावतीत 'या' तीन प्रभागात चुरशीची लढत, आमदार राणांसह मुख्यमंत्री फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

SCROLL FOR NEXT