पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी  sakal media
देश

लोक उगाच श्रेय घेतात; PM मोदी असं कुणाला म्हणाले?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काही पक्ष केवळ एखाद्या प्रकल्पाचे श्रेय कधी घेता येईल याची वाट पहात असतात, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. (Prime Minister Narendra Modi inaugurates the Saryu Nahar National Project in Balrampur ) नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी 9,800 कोटी रुपयांचा सरयू कालवा प्रकल्पाचे उद्धाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, उत्तर प्रदेशातील भाजपच्या प्रतिस्पर्धी पक्षांवर ताशेरे ओढत या प्रकल्पाचे श्रेय कधी घेता येईल याची ते वाट पाहत होते असा चिमटाही मोदी यांनी काढला आहे.

मोदींची ही टिप्पणी समाजवादी (PM Modi Comment on SP Leader Akhilesh Yadav ) पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या विधानानंतर आली आहे, ज्यात त्यांनी असा दावा केला होता की, सपा सरकारच्या काळात या योजनेचे तीन चतुर्थांश काम पूर्ण झाले होते.योजनेतून 14 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमिनीच्या सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. तसेच सुमारे 19 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

बलरामपूर येथील कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, आज मी दिल्लीहून निघालो, तेव्हा सकाळपासून वाट पाहत होतो की, या प्रकल्पाची फीत आम्हीच कापली होती, आम्हीच ही योजना सुरू केली होती असे कुणीतरी म्हणेल, बहुतेक असे वक्तव्य करणाऱ्यांनी लहानपणीच या योजनेची फीत कापली असावी, असेही मोदी यावेळी म्हणाले. सरयू कालव्याच्या प्रकल्पात पाच वर्षांपूर्वी जेवढे काम झाले होते, त्यापेक्षा जास्त काम आम्ही केले आहे. हे दुहेरी इंजिन सरकार आहे. डबल इंजिन सरकारच्या कामाचा हा वेग असल्याचे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

रावत यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे अपघाती निधन हे प्रत्येक भारतीयांसाठी मोठे नुकसान आहे. देशाच्या सैन्याला स्वावलंबी बनवण्यासाठी जनरल बिपीन रावत किती मेहनत घेत होते, याचा सारा देश साक्षीदार असल्याचे ते म्हणाले.

एम्स रूग्णालयासाठी सपाने दिली जमीन

कोरोनाच्या सर्वाधिक काळात गरजूंना मदत करणारी सर्व रुग्णालये समाजवादी सरकारच्या काळात उघडण्यात आली. भाजपला केवळ फीत कापण्याची सवय आहे, असा आरोप करत त्यांच्या सरकारने गोरखपूरमध्ये जमीन दिली नसती तर तेथे एम्स बांधले गेले नसते, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT