Modi, Shah  
देश

सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल PM मोदींनी जाणून घेतलं गडकरींचं मत

सूरज यादव

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आठवड्याभरात मोदींच्या निवासस्थानी भाजप अध्यक्षांसह केंद्रींय मंत्र्यांसोबत बैठका होत आहेत. यातच सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इतर सहकाऱ्यांचीही बैठक झाली. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा हेसुद्धा उपस्थित होते. बैठकीमध्ये मोदींकडून वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये झालेल्या कामाचा आढावा घेतला गेल्याची चर्चा आहे. तसंच इतर काही मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये सरकारच्या कामगिरीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत मोदींनी जाणून घेतल्याचंही म्हटलं जात आहे.

विशेष म्हणजे मोदींच्या आठवड्याभरात अनेक मंत्र्यांसोबत बैठका झाल्या यावेळी भाजप अध्यक्षसुद्धा उपस्थित होते अशी माहिती समजते. गेल्या आठवड्यात मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि जितेंद्र सिंह यांच्याशी चर्चा केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर बैठका घेतल्या जात असल्याची चर्चा आहे. या सर्व बैठका पाच तासांपर्यंत चालल्या आहेत.

मंत्रालयाच्या कामाकाजाचा आढावा घेत असताना सध्याच्या घडामोडींबाबतही चर्चा या बैठकींमध्ये होत आहेत. देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. दरम्यानच्या काळात मोदी सरकारवर कोरोनाच्या लढ्यात कमी पडल्याच्या टीकाही होत आहेत. त्यामुळे या बैठकीत यावरही चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्षांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठका पक्षबांधणीसाठी असल्याचंही म्हटलं जातंय. आगामी वर्षात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोव्याच्या विधानसभा निवडणुका आहेत. या राज्यातील पक्षाची कामगिरी आणि संघटनात्मक तयारी संदर्भातही चर्चा होऊ शकते. पाच पैकी चार राज्यात भाजपचे सरकार असून पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Strawberry Cultivation : आंबेगाव, खेड, जुन्नर व मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४.९६ कोटी रुपये निधी मंजूर; विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

SCROLL FOR NEXT