देश

केनियाच्या माजी PMच्या मुलीला भारतात मिळाली दृष्टी; मोदींची भेट घेत म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केनिया देशाचे माजी पंतप्रधान रायला ओडिंगा (Former Kenya PM Raila Odinga) हे सध्या भारतात आले आहेत. त्यांच्या मुलीला दृष्टीदोष उत्पन्न झाल्याने तिला काहीही दिसत नव्हते. तिच्यावर पारंपारिक आयुर्वेदीक पद्धतीने उपचार करण्यासाठी सध्या भारतातील केरळमध्ये (Kerala) आले आहेत. इथल्या आयुर्वेदीक उपचारांनी ती बरी झाल्याचा दावा त्यांनी स्वत: केला आहे. शिवाय यामुळे प्रभावित होऊन ही उपचार पद्धती अफ्रिकेमध्ये नेण्याबाबत ते सकारात्मक झालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनी आज रविवारी केनियाचे माजी पंतप्रधान रायला अमोलो ओडिंगा यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. या दोन्हीही नेत्यांमध्ये अनेक दशकांपासून मैत्रीपूर्ण वैयक्तिक संबंध आहेत. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, जवळपास साडेतीन वर्षांनंतर ओडिंगा यांना भेटल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला.

या भेटीत दोन्हीही नेत्यांनी भारत-केनिया संबंध अधिक दृढ करण्याबाबत उत्सुकता व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनी ओडिंगा यांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. (India-Kenya relations)

यावेळी बोलताना केनियाचे माजी पंतप्रधान म्हणाले की, मी माझ्या मुलीच्या डोळ्याच्या उपचारांसाठी भारतात आलो आहे. केरळमधील कोचीमध्ये तिच्या डोळ्यांवर उपचार सुरु आहेत. तीन आठवडे तिच्या डोळ्यांवर उपचार सुरु असून तिच्या दृष्टीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतो आहे. माझ्या कुटुंबासाठी हे मोठा सुखद धक्का आहे की, माझी मुलगी आता बऱ्यापैकी सगळं पाहू शकतेय.

पुढे ते म्हणाले की, या पारंपारिक औषधांमुळे तिला अंतिमत: दृष्टी परत मिळाली आहे. यामधून आम्हालाही मोठा आत्मविश्वास प्राप्त झाला आहे. मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली असून ही आयुर्वेदाची उपचार पद्धती आफ्रिकेमध्ये नेण्याचा आणि उपचारांसाठी देशी वनस्पतींचा वापर करण्यासाठी प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War : 'भारतासाठी ही स्थिती चिंताजनक, युद्ध थांबले नाही तर देशावर त्याचे गंभीर परिणाम होणार'; PM नरेंद्र मोदी यांचा इशारा

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; युद्धस्थिती शमल्याचा परिणाम

Latest Marathi News Live Update : रुपाली पाटील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

Dhurandhar Movie Controversy: बॉक्स ऑफिसवर गाजणारा ‘धुरंधर’ आता कायद्याच्या रडारवर; बंदी घालण्याची मागणी

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

SCROLL FOR NEXT