PM Modi in Bengaluru ISRO eSakal
देश

PM Modi in Bengaluru : पंतप्रधान मोदींनी घेतली इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट; 'चांद्रयान-3' मोहिमेबद्दल केलं अभिनंदन!

Chandrayaan 3 : चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पडली, त्यावेळी पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेत होते.

Sudesh

पंतप्रधान मोदींनी आज सकाळी इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेत 'चांद्रयान-3' मोहिमेच्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. ही मोहीम पार पडली तेव्हा मोदी ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत होते. आपला परदेश दौरा पार पडल्यानंतर थेट बंगळुरूमध्ये दाखल होत, त्यांनी या वैज्ञानिकांची भेट घेतली.

23 ऑगस्टला जेव्हा इस्रोने ही मोठी कामगिरी पार पाडली, तेव्हा पंतप्रधान मोदी ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत होते. यावेळी त्यांनी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक क्षण पाहिला होता. त्यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं होतं. तसंच, भारतात आल्यानंतर आपण पहिल्यांदा इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेणार असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले होते.

चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडून, भारताने नवा विक्रम केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. याचं श्रेय हे नक्कीच इस्रोच्या वैज्ञानिकांचं आहे. त्यामुळेच, त्यांचं विशेष अभिनंदन करण्यासाठी पंतप्रधान मोदी बंगळुरूमध्ये दाखल झाले.

आपलं दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आज सकाळी थेट बंगळुरू विमानतळावर उतरले. यानंतर बंगळुरूमधील इस्रोच्या मिशन कंट्रोल सेंटरवर जात त्यांनी सर्व वैज्ञानिकांची भेट घेतली. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ, माजी प्रमुख के. सिवान आणि इतर सर्व वैज्ञानिकांचं त्यांनी अभिनंदन केलं. यावेळी सोमनाथ यांनी मोदींना मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या लँडर-रोव्हर प्रतिकृतींमधून चांद्रयान-3 बाबत अधिक माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Latest Marathi News Live Update : पिकाचा पंचनामा करताना तलाठ्याला सर्पदंश

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT