G20 Summit PM Modi Speech eSakal
देश

G20 Summit : अडीच हजार वर्षांपूर्वीच्या मंत्रातून दिला जगाला संदेश; G20 बैठकीला संबोधताना काय म्हणाले PM मोदी?

PM Modi : G20 बैठकीची सुरुवात पंतप्रधान मोदींच्या भाषणाने झाली.

Sudesh

भारतातील जी20 परिषदेच्या मोठ्या बैठकीचा आज पहिला दिवस आहे. दिल्लीमध्ये आज आणि उद्या ही बैठक पार पडणार आहे. यासाठी कित्येक देशांचे अध्यक्ष, राष्ट्रपती आणि पंतप्रधान भारतात दाखल झाले आहेत. या बैठकीची सुरुवात पंतप्रधान मोदींच्या भाषणाने झाली.

या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी एका प्राकृत भाषेतील मंत्रामधून सर्व उपस्थितांना एक संदेश दिला. "प्रगती मैदानापासून काही किलोमीटर अंतरावर एक 2,500 वर्षे जुना स्तंभ आहे. या स्तंभावर प्राकृत भाषेत लिहिलं आहे, की - 'हेवं लोकशःहित मुखेति, अथः इयं नातेशु हेवं'. अर्थात, मानवतेचं हित आणि कल्याण सुनिश्चित होऊदे." असं पंतप्रधान म्हणाले.

अडीच हजार वर्षांपूर्वीच भारताने संपूर्ण जगाला मानव कल्याणाचा हा संदेश दिला होता. G20 समूह देखील याच दृष्टीने प्रयत्न करतो, त्यामुळे या संदेशाने आपल्या बैठकीची सुरुवात करूया असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

सबका साथ-सबका विकास

यासोबतच पंतप्रधान मोदींनी जी20 सदस्यांना 'सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास-सबका प्रयास' हा संदेश दिला. आपल्याला जगासमोर असणाऱ्या सर्व प्रश्नांना मिळून तोंड द्यायचं आहे. आणि पुढील पिढीसाठी वैश्विक समस्यांवर ठोस उपाययोजना करायची आहे असंही मोदी यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT