Asaduddin-Owaisi-AIMIM 
देश

'या' दोन गोष्टींवर बोलायला मोदींची बोबडी वळते; ओवैसींचा घणाघात

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : AIMIM पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. त्यांनी अनेक प्रश्नांच्या बाबतीत मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पंतप्रधान मोदी काही बाबतीत अजिबात तोंड उघडत नाहीत, ते जाणीवपूर्वक मौन बाळगतात, असं त्यांनी म्हटलंय. एक म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणि देशात घुसलेला चीन याबाबत मोदीजी चिडीचूप आहेत. कारण ते चीनला घाबरतात, असं मत औवेसी यांनी व्यक्त केलंय.

पेट्रोलच्या किंमतीवर चिडीचूप

ओवैसी म्हणाले की, पंतप्रधान मोदी दोन गोष्टींवर कधीच तोंड उघडत नाहीत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र, त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. पेट्रोल-डिझेलची सेंच्यूरी झालीय, मात्र पंतप्रधान म्हणतात, मित्रो, फिकर मत करो!

चीनला घाबरतात PM मोदी

पुढे ते म्हणाले की, दुसरीकडे चीन आपल्या देशात घुसून ठाण मांडून बसला आहे. जेंव्हा पुलवामा घडलं तेंव्हा मोदींनी म्हटलं होतं की, घर में घुस के मारेंगे! आम्ही म्हटलं, मारा! मात्र, आता चीन आपल्या देशात घुसून बसला आहे, मात्र हे काहीच करत नाहीयेत. चीन भारताच्या भूमीत घुसत असताना पंतप्रधान काहीच करत नाहीयेत. भारताचे पंतप्रधान चीनबाबत बोलायला घाबरतात. असं वाटतंय की, ते चीनच्या भीतीमुळे चहामध्ये सुद्धा चीनी (साखर) टाकत नसतील. आपले ९ जवान जम्मू काश्मीरमध्ये मृत्यूमुखी पडलेत आणि 24 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान T20 क्रिकेट सामना होणार आहे,

पाकिस्तान काश्मीरमध्ये जीवाशी खेळतेय

पाकिस्तान काश्मीरमध्ये लोकांच्या जीवाशी टी-ट्वेंटी खेळत आहे. 370 कलम रद्द केल्यावर काश्मीरमध्ये शांतता नांदेल असं म्हणालात, पण कुठाय शांतता? असा सवाल AIMIM पक्षाचे खासदार ओवैसी यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बोलेरो पिकअप आणि ट्रकचा भीषण अपघात; ८ भाविकांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Danoli Village Bandh : माणुसकीचा हुंकार! दानोळीत सामाजिक एकोप्याचा स्वर; भरतेशच्या निधनामुळे बौद्ध समाजाचा मोठा निर्णय

Jalgaon ACB Trap : 'केवायसी'साठी 100 रुपये लाच घेताना महिला कर्मचाऱ्याला अटक; ACB ची धडक कारवाई, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : हापालिकेत ‘टक्केवारी’वरून भाजपमध्येच वाद; आजी-माजी नगरसेविकांमध्ये जोरदार वादाचा व्हिडिओ व्हायरल

MSRTC Buses Upgrade : राज्यात एसटी बसेसचे रुपडे पालटणार, बैठक व्यवस्था बदलून नव्याने ३ हजार बसेस रस्त्यावर धावणार

SCROLL FOR NEXT